लॉकडाऊननंतर मुंबईतील प्रवासी वाहतुकीवर होणार मोठा परिणाम; कसा? घ्या जाणून...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मुंबईत हाताला काम नसल्याने अनेक कामगारांनी घराकडचा रस्ता धरला आहे. मुंबईत तर कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने अनेक जण गावी निघून जात आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मुंबईत हाताला काम नसल्याने अनेक कामगारांनी घराकडचा रस्ता धरला आहे. मुंबईत तर कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने अनेक जण गावी निघून जात आहे. मात्र लॉकडाऊनमुळे प्रवासाची पुरेशी साधनं उपलब्ध नसल्याने काहींनी श्रमिक स्पेशल रेल्वेचा आधार घेतला, तर काहीजण मिळेल त्या वाहनाने घरी जात आहे. 

मोठी बातमी ः दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

लॉकडाऊमुळे टॅक्सी, रिक्षा चालकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. युपी, बिहार, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, उडीसा राज्यातून मुंबईत टॅक्सी व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे टॅक्सी चालक आता प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या घेऊनच आपल्या राज्यात परतल्याने, मुंबईतील प्रवासी वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे. 

मोठी बातमी ः शहरात कोरोनाचे संकट; तर गावाकडे चाकरमान्यांसमोर अडचणींचे डोंगर

मुंबईत सुमारे 40 हजार टॅक्सी आहे. त्यापैकी सध्या सुमारे 8 हजार टॅक्सी सध्या मुंबईत आहे. त्याचप्रमाणे पावने दोन लाख रिक्षांपैकी 30 हजार रिक्षा मुंबईत असतील त्यामूळे सुमारे 32 हजार टॅक्सी आणि सुमारे दिड लाखाच्या जवळपास रिक्षा चालक त्याचप्रमाणे, ओला, उबेर मध्ये असलेल्या टी परमीट ची वाहन चालवणारे उत्तर भारतीय नागरिक सुद्धा वाहनांसोबत आपल्या गावी पोहचले असल्याचे टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए एल क्वाड्रोस यांनी सांगितले.

मोठी बातमी ः बॉलिवूडला आणखी एक धक्का; कर्करोगाने झाले तरुण अभिनेत्याचे निधन...

कोरोनाच्या संसर्गाने मुंबईकरांच्या मनात आधीच धडकी भरली आहे. त्यामुळे लाॅकडाऊन उघडल्यानंतर ही मुंबईकर रेल्वेने प्रवास करणार की नाही ? यामध्ये शंका आहे. त्यामूळे टॅक्सी, रिक्षा, ओला, उबर हा पर्याय उत्तम होता. त्याशिवाय रेल्वेच्या लोकलमधील जीवघेण्या गर्दीपासून वाचण्यासाठीसुद्धा टॅक्सीचा पर्याय उत्तम आहे. मात्र, टॅक्सी, रिक्षा, ओला, उबर चालकांनी कोरोनाच्या भितीमूळे आपल्या राज्यात जाणेच पसंत केल्याने, भविष्यात मुंबईतीस टॅक्सी व्यवसायावर गडांतर येण्याची शक्यता आहे. 

मोठी बातमी ः कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

विमानतळावरील कुल कॅब गायब
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुल कॅब चालवणारे चालक परराज्यातील होते. कुल कॅब चालवून मुंबईत सोबत असणारे कुटूंब आणि गावी असलेल्या कुटूंबांचा गाडा सुद्धा याच कमाईवर चालत होता. मात्र, 23 मार्च पासून राज्यात लाॅकडाऊन झाल्यानंतर विमानतळावरील टॅक्सी, कुल कॅब चालकांच्या व्यवसायावर सुद्धा मरगळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानसेवा सुद्धा बंद असल्याने, टॅक्सी आणि कुल कॅबच्या प्रवासी वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्यांनी आपल्या राज्यात जाणेच पसंत केले आहे.

मोठी बातमी ः कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश

टॅक्सी, रिक्षा, ओला, उबर वाहन चालकांनी आपल्या वाहनांसह मुंबई सोडल्याने भविष्यात प्रवासी वाहतूकीची परिस्थिती फार गंभीर होणार आहे. सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊन काळात टॅक्सी सुरू करण्याची मागणी राज्याचे परिवहन सचिव आशिष कुमार सिंह यांच्याकडे केली आहे. मात्र, राज्य शासनाकडून कोणताही प्रतिसाद नाही. 
- ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, टॅक्सी मेन्स युनियन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many taxi drivers in mumbai went to home by taxi, will effects on public transport