

Mumbai Rain Orange Alert
ESakal
मुंबई : बरेच दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा राज्यभरात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगर जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज सोमवार (ता. २०) रोजी देखील सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण असून पावसाच्या ये-जा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अशातच हवामान विभागाने मुंबईसह इतर जिल्ह्यांत पुढील ४८ तास पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.