कौतुकास्पद! उत्तर भारतीय महिलेच्या बाळाला पहाटे 3 वाजता उपलब्ध करून दिलं दूध

baby
baby
Updated on

मुंबई : सध्या राज्य सरकारपुढे एकच गंभीर प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे या लॉकडाऊनच्या काळात मजुरांना आपल्या गावी सुखरूप पाठवणं. मात्र काही मजूर सरकारचं न ऐकता मिळेल त्या वाहनानं किंवा वेळ आलीच तर पायीच शेकडो मैल प्रवास करत आहेत. रस्त्यात अनेक अडचणी येऊनही हे मजूर आपलं गाव गाठण्यासाठी धडपड करत आहेत. रस्त्यात अनेक लोकं त्यांना मदत करत आहेत. 

शहापूरच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एक कौतुकास्पद का केलंय. काही उत्तर भारतीय कुटुंब गाडीनं आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र शहापूरजवळ त्यांची गाडी बंद पडली. एका महिलेसोबत तिचं लहान बाळही होतं. गाडी बंद झाल्यामुळे बराच वेळ लागणार होता. त्यातील एका बाळाला दुधाची गरज होती. मात्र इतक्या पहाटे तिच्या बाळाला दूध कुठे मिळणार या चिंतेनं त्या आईचं मन सुन्न झालं. मात्र अशावेळी शहापूर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष या उत्तर भारतीयांच्या मदतीला आले. 

शहापूर शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती धीर्डे आणि संपर्क प्रमुख आकाश सावंत यांनी घटनास्थळावर जाऊन या मजुरांची चौकशी केली. त्यावेळी या बाळाला दुधाची गरज आहे असं लक्षात येताच त्यांनी आजूबाजूला दुधाचा शोध घेतला मात्र त्यांना दूध मिळालं नाही. लॉकडाऊन सुरु असल्यामुळे कुठेच दुध मिळणं शक्य नव्हतं. अशावेळी मारुती धीर्डे यांनी आपल्या घरी जाऊन या लहान बाळासाठी दूध आणलं. यानंतर या महिलेनं आपल्या बाळाला दूध दिलं. 

शिवसेनेनं फक्त या लहान बाळाचीच नाही तर या महिलेसोबत प्रवास करणाऱ्या तब्बल ८० जणांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यांनी सर्वांना दुपारी जेवण, दूध, बिस्किट, पाण्याच्या बाटल्याही उपलब्ध करुन दिल्या. आपल्या लहान बाळाला वेळच दूध उपलब्ध करून दिल्यामुळे त्या आईच्या जिवात जीव आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या मदतीसाठी या उत्तर भारतीय नागरिकांनी शहापूर शिवसेनेचे आभार मानले आहेत.

Milk available to North Indian woman's baby at 3 am read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com