

MNS Protest in Kalyan
ESakal
कल्याण : नीट परीक्षेतील गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने उग्र आंदोलन केले. यावेळी तरुणांनी संसदेकडे कूच करताच पोलिसांकडून लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या प्रकारामुळे हे प्रकरण आणखी चिघळले असून देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्ववभूमीवर कल्याण येथे मनसे सेना आक्रमक झाली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या फोटोला काळे फासल्याचे समोर आले.