काय सांगता! केवळ 15 दिवसात 1000 पेक्षा जास्त खाटांचे कोरोना रुग्णालय तयार, वाचा

bandra quarantine centre
bandra quarantine centre

मुंबई : वांद्रे- कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पंधरा दिवसाच्या कालावधीत कोविड 19 केअर सेंटर तयार केले. हे रुग्णालय लवकरच बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) कडे सुपूर्द करण्यात येणार आहे.  

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली आहे. एमएमआरडीए मैदानावरील देशातील पहिले कोरोना केअर सेंटर केवळ 15 दिवसांमध्ये तयार करण्यात आले. त्याममध्ये 1008 खाटांची सुविधा असून तेथे नव्याने 1000 खाटांचे अतिदक्षता विभाग देखील उभारले जात आहे. 1008 खाटांच्या या रुग्णालयात रूग्णांचे राहणे, ऑक्सिजन आणि चाचणी घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. या रुग्णालयात नॉन क्रिटिकल बाधितांवर उपचार केले जातील. प्राधिकरणाने 2 मे पासून 1008 खाटांच्या सुविधा प्रकल्पाला करून ते 16 मे रोजी पूर्ण केले. या प्रकल्पाचा एकूण निधी पुढील तीन महिन्यांसाठी सुमारे 20 कोटी रुपये असून प्रकल्पासाठी मुदतवाढ आवश्यक असल्यास भाड्याने दिलेल्या छतावर अतिरिक्त निधी खर्च केला जाणार आहे.   

यामध्ये 1008 खाटांपैकी 504 बेडमध्ये ऑक्सिजन सुविधा नसलेले बेड आहेत. तर उर्वरित 504 बेडमध्ये 240 बाय40 मीटर क्षेत्रामध्ये ऑक्सिजनची सुविधा आहे. कोरोना बाधित रूग्णांचा विचार करून स्वच्छता आणि उपाययोजनांमध्ये अत्यंत काळजी घेण्यात आली आहे. या सुविधेमध्ये स्वच्छतागृहे व वॉशरूमची सुविधा करण्यात आली . प्राधिकरणाकडून वीज आणि पाणीपुरवठ्याचीही दखल घेण्यात आली आहे. सर्व हवामान परिस्थितीचा विचार करून हे कोरोना सेंटर उभारले गेले. विशेषत: आगामी पावसाळ्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. हे केअर सेंटर सव्वा लाख चौरस फुटांपर्यंत पसरले असून 11 मे रोजी अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनीही रुग्णालयाला भेट दिली.

या रुग्णालयात स्टोरेज सुविधेसह पॅथॉलॉजी, ईसीजी आणि एक्स-रे मशीनसह देखील सुसज्ज आहे. या रुग्णालयात कोविड 19 ची चाचणी होणार नाही.  तर केअर सेंटरमध्ये हलके लक्षणे व अर्ध-गंभीर रोगसूचक रुग्णांवर उपचार केले जातील. एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे 350 कामगार आणि एमएमआरडीएचे 70 अधिकार्‍यांनी चोवीतास काम करत अवघ्या 15 दिवसात कोविड 19 सेंटर उभारले असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले .

एमएमआरडीएकडून पालिकेला 13 हजार घरे
कोरोना रुग्णांची संख्या पाहता एमएमआरडीने प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी तयार केलेली 13 हजार घरे महापालिकेला दिली आहेत. या घरांचा वापर रुग्ण्याच्या विलगीकरणासाठी अथवा उपचारांसाठी करता येणार आहे.

read more than 1000 beds Corona Hospital in just 15 days,  Read in detail

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com