MGL CNG Rate : मुंबईकरांना १ सप्टेंबरपासून दुहेरी आर्थिक फटका बसला असून सीएनजी-पीएनजीसोबत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ झाली आहे. महानगर गॅसने सीएनजीच्या दरात ₹2 प्रति किलो वाढ केली असून मुंबई आणि आसपासच्या भागात नवीन दर ₹88 प्रति किलो झाला आहे.
मुंबईकरांना १ सप्टेंबरपासून दुहेरी आर्थिक फटका बसणार आहे. एका बाजूला 'महानगर गॅस'ने सीएनजी (CNG) आणि घरगुती पीएनजी (PNG) च्या दरात वाढ केली आहे, तर दुसरीकडे टॅक्सी आणि रिक्षांच्या भाड्यातही वाढ झाली आहे.