मुंबई : कोरोना नियंत्रणात ; रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेचे रुग्ण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MUmbai

मुंबई : कोरोना नियंत्रणात ; रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेचे रुग्ण वाढले

मुंबई : मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताच रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. आता रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी वेटिंग नंबर मिळू लागला आहे. डोळ्यांच्या मोतीबिंदूपासून ते गुडघ्याच्या शस्त्रक्रियेपर्यंत अनेक शस्त्रक्रियांसाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागते.

ज्या रुग्णांनी गेल्या 18 महिन्यांत मोतीबिंदू, गुडघेदुखी किंवा वाढत्या फायब्रॉइड्सकडे दुर्लक्ष केले होते, ते आता रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे, सरकारी रुग्णालयांसह  खासगी रुग्णालयात काम करणारे सर्जन सध्या खूप व्यस्त आहेत. अचानक वाढलेल्या रुग्णांच्या रांगा पाहता आता खासगी रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी दिवस निश्चित केला जात असून दुसरीकडे प्रतीक्षा यादीही वाढत आहे.

हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा हे अशा डॉक्टरांपैकी एक आहेत ज्यांना आता महामारीच्या काळात पूर्वीपेक्षा दररोज अधिक शस्त्रक्रिया कराव्या लागतात. ज्या लोकांनी दोन वर्षांपासून शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत त्यांनी आता शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: अलकापा नावाच्या दुर्मिळ ह्रदय रोगावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया

जेजे रुग्णालयातील नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनी सांगितले की, त्यांच्या टीमला आता दिवसाला 150 शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार राहावे लागेल.  कोविडमुळे शस्त्रक्रियेचा आलेख एका दिवसात 20 ते 30 टक्क्यांपर्यंत

घसरला होता, पण आता कोरोना आटोक्यात आल्यानंतर लोक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार आहेत. गेल्या आठवड्यात डॉक्टरांच्या टीमने दररोज सरासरी 70 शस्त्रक्रिया केल्या आहेत. आता गर्दी वाढल्याने आलेख वाढेल आणि प्रतीक्षा यादीही वाढेल.

परभणीतील 800 रुग्णांना येत्या काही दिवसांत 70 बॅचमध्ये रुग्णालयात येण्यासाठी तारखा देण्यात आल्या आहेत, असेही डाॅ.पारेख यांनी सांगितले.

हेही वाचा: "२० वर्ष पक्षाचं काम केलं..."; पायलट यांनी स्पष्ट केली भूमिका

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता

डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, दररोज 100 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या जातात, त्यात लहान-मोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. आता ही संख्या हळूहळू वाढत आहे. यामुळे रुग्णांना आता शस्त्रक्रियेसाठी तारीख दिली जात आहे.

सायन रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुधीर शरण म्हणाले की, आता गुडघे आणि नितंब बदलण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. एकूणच शस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे.  कोविडपूर्व काळात जेवढ्या शस्त्रक्रिया केल्या जायच्या तेवढेच सध्या प्रमाण आहे .

loading image
go to top