मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी

मुंबई : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृती दिना निमीत्त आज शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन केले.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रुग्णालयात असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे परदेशात असल्याने त्यामुळे ते स्मृती स्थळावर येऊ शकले नाहीत. उध्दव ठाकरे यांचे कनिष्ठ पुत्र तेजस ठाकरे यांनी स्मृतीस्थळावर उपस्थीत राहून अभिवादन केले.

शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी स्मृती स्थळावर बाळासाहेबांना अभिवादन केले.तर,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले.नेते,पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती.मंगळवार रात्री पासूनच मुंबईच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी येत होते.कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

कंगणाचा उल्लेख टाळला

स्मृती स्थळाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सर्वच नेत्यांची अभिनेत्री कंगणा रनौत बद्दल बोलण्याचे टाळले.शिवसेना नेते संजय राऊत,जितेंद्र आव्हाड,छगन भुजबळ,महापौर किशोरी पेडणेकर,खासदार अरविंद सावंत यांनी कंगणाचा उल्लेख करणेही टाळले.

हेही वाचा: जळगावः मनसेचे मनपासमोर ‘झोपा काढा’ आंदोलन

संजय राऊत शिवतिर्थवर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी शिवाजी पार्क जवळील शिवतीर्थ या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या घरात जाऊन त्यांची भेट घेतली. नोव्हेंबर 2005 मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांचे मन वळविण्यासाठी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह राऊत राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी गेले होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नकली हिंदूत्वाचा धोका देशाला असल्याचे म्हटले होते.तेच हिंदूत्व आता पाहायला मिळत आहे.विक्रम गोखले कोण त्यांनी स्वतंत्र लढ्याचा अपमान केला.अशा व्यक्तीच्या मध्यस्तीची गरज नाही.बाळासाहेबांनी स्वाभीमानाने जगायला शिकवलं.हिंदूत्व आणि मराठी विचार रुजवला.संकट आल्यावर बाळासाहेब हवे होते अशी आठवण येते.

- संजय राऊत, शिवसेना नेते

हेही वाचा: 'शिवसेना भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही'; विक्रम गोखले

भुजबळांचा जय महाराष्ट्र

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र म्हणत बोलण्यास सुरवात केली.साहेबांचे डावे उजवे आहाेत.बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कटिबध्द आहोत.समाजमाध्यमांवर जे बाेलले जात आहे त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.त्या विरोधात सगळ्यांनी उभे राहीले पाहिजे.सर्व बाजूला सारुन काही तरी हिंदू मुस्लिम वाद करायचा.पोळी भाजायाची असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

loading image
go to top