
लालबागचा राजा २०२५ मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात प्रथम दर्शन पार पडलं आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लालबागचा राजा स्थापत्य, कलात्मकतेचा अद्भुत संगम दर्शवत आहे. आज लालबागच्या राजाचा पहिला लूक भक्तांसमोर आला आहे. लालबागच्या राजाची पहिली झलक भक्तांना दिसली आहे. तिचे मनमोहक रूप पाहून सर्वांचे डोळे दिपले आहे. लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय गणेश मंडळांपैकी एक आहे. जो या प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून पर्यटकांना आकर्षित करतो.