Mumbai : डोंबवलीत बॅनर लावत मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai news

Mumbai : डोंबवलीत बॅनर लावत मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार...

डोंबिवली : डोंबिवली मधील एमआयडीसी निवासी विभागातील स्त्याच्या झालेल्या दुरावस्थामुळे मनसेने सत्ताधारी शिवसेनेला अनेक वेळेला कोंडीत पकलडे होते.याचवरून मनसे आणि शिवसेनेत अनेकदा आरोप प्रत्योरोप करण्यात आले होते .तसेच मनसेने रस्त्याच्या कामावरून अनेकदा बॅनर लावत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता.

हेही वाचा: Mumbai : वाहतूक पोलिसांकडून वाहतूकदारांना ऑनलाईन दंडाचा सपाटा

याला शिवसेने सुद्धा बॅनर मधून उत्तर दिले.मात्र तुम्ही रस्त्यांचे काम सुरू केलेतर तुमच्या अभिनंदनाचे बॅनर देखील लावू असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आणि मनसे आमदार यांनी दिलेला शब्द पाळत डोंबिवली एमायडीसी निवासी विभागात बॅनर लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: Mumbai : रेल्वेच्या चुकीच्या निर्णयाचा फटका, विद्याविहार एक्सलेटरवर 32 लाखांचा चुराडा

मनसे आमदार लावले होते बॅनर.....

डोंबिवली एमआयडीसी रस्त्यांच्या विकासासाठी निधी मंजुर होतात, बॅनर देखील लागतात मात्र कामाची सुरुवात होत नाही. यावरुन मनसेने कधीतरी तयार झालेले रस्ते दाखवा अशा आशयाचे बॅनर एमआयडीसी भागात लावत शिवसेनेला डिवचले होते. डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांची काम गेले अनेक वर्षे न झाल्याने या रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे.

हेही वाचा: Mumbai : कल्याण मध्ये एका व्यक्तीचा थरार; स्कायवॉकच्या जाळीवर जाऊन बसला

या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटींचा निधी मंजुर झाला असून 20 वर्षापासून रखडलेले रस्ते लवकरच नीट होणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आणि त्याचे बॅनरदेखील या भागात लागले होते. बॅनर लागून सहा सात महिने उलटले तरी कामास सुरुवात न झाल्याने यावरुन मनसेने शिवसेनेला ट्रोल करीत एमआयडीसी परिसरात बॅनर लावले होते.

हेही वाचा: Mumbai : अन्न नागरी पुरवठा विभागातील पदोन्नती थांबवली

कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा असे या बॅनरवरील ठळक विधान शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी श्रेयाचे लागलेले बॅनर तिनदा फाटले पण काम झाले नाही असा खोचक टोला ट्विटरच्या माध्यमातून लगावला होता.

हेही वाचा: Mumbai : डोंबिवलीत दिवसा ढवळ्या होतेय चोरीमहावितरणच्या इलेक्ट्रिक बॉक्सचा दरवाजाच काढून नेला

खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचे उत्तर....

दरम्यान शिंदे यांनी मनसे आमदार पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, रस्त्यांच्या कामासाठी निधी आणला टेंडर देखील निघाले असून आता त्या कामांचा शुभारंभ देखील झाला आहे. शिवसेना वचन देते आणि आज ही वचनपूर्ती झाली आहे. काही लोकं म्हणाले होते की काम करुन दाखविल्यास अभिनंदनाचे बॅनर लावू, तर उद्या हे बॅनर लागतील यात तिळमात्र शंका नाही असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला.

हेही वाचा: Mumbai Traffic: अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; 'पश्चिम द्रुतगती'साठी सहा पर्याय

यावर पाटील यांनी बॅनर लावणार असे सांगितले. तसेच पालकमंत्री शिंदे यांनी देखील पाटील यांना तुम्हाला बॅनर लावावे लागतील असा खोचक सल्ला दिला होता.यावर मनसे आमदार पाटील म्हणाले, चांगले काम केले तर अभिनंदन आणि कौतुक करण्यास काहीच हरकत नाही.

हेही वाचा: Mumbai : अन्न नागरी पुरवठा विभागातील पदोन्नती थांबवली

आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे, हा लोकांचा विजय आहे आणि काम सुरु झाले तर मी अभिनंदनाचा बॅनर नक्की लावणार असे सांगितले.

हेही वाचा: Mumbai : मुंबईकरांचा प्रवास केव्हा आरामदायी होणार; रेल्वे प्रकल्प रखडले!

मनसे आमदार यांनी लावले बॅनर....

आता याच रस्त्याचे कामे सुरू झाली असून मनसे आमदार यांनी दिलेला शब्द पाळत डोंबिवली एमायडीसी निवासी विभागात बॅनर लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.