Mumbai Street Dogs: भटक्या श्वानांची दहशत कायम; मार्च अखेर मुंबईतील ७० टक्के श्वानांचे लसीकरण

लसीकरण मोहिमेचा वेग: मुंबईतील भटक्या श्वानांसाठी सुरक्षा कवच|
Mumbai Street Dogs
Mumbai Street Dogssakal

Mumbai News: मुंबईत भटक्या श्वानांची दहशत कायम आहे. मुंबईतील भटक्या श्वानांच्या लसीकरणाची प्रक्रिया विविध संस्थांच्या माध्यमातून सुरू असून पुढच्या महिन्यात मार्च अखेर मुंबईतील ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्याची निर्धार पालिकेने केला आहे. आतापर्यंत २५ हजार श्वानांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

Mumbai Street Dogs
Street Dogs : भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताना, ही समस्या तर दुर्लक्षित करत नाही ना?

भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणा-या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने 'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प' अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी अभियान सुरू आहे. या अंतर्गत विविध संस्थांच्या साहाय्याने मुंबई महानगरातील किमान ७० टक्के श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण पुढच्या मार्च अखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

या पैकी आतापर्यंत २५ हजार श्वानांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे व त्याद्वारे भटक्या श्वानांच्या चाव्यामार्फत होणाऱ्या रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे, प्राणी कल्याण संरक्षण करणे, रेबीजचा प्रसार कमी करून नागरिकांची सुरक्षा याला प्राधान्य दिल्याची माहिती पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.

Mumbai Street Dogs
Mumbai Street Food: मिठीबाईच्या खाऊगल्लीची सफर अन् ६५ प्रकारचे डोसे

मुंबईत भटक्या श्वानांची संख्या सुमारे ९५ हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे २५ हजार भटक्या श्वानांचे सप्टेंबर २०२३ पासून आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहेत. तर, मार्च २०२४ च्या शेवटपर्यंत सुमारे ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी पालिकेच्या वतीने जॅनीसी स्मिथ ऍनिमल वेल्फेअर ट्रस्ट, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, यूनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांतील प्रशिक्षित पशुवैद्यकीय तज्ञांच्या साहाय्याने हे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. पठाण यांनी दिली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती द्यावी तसेच लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Mumbai Street Dogs
Mumbai News: स्वच्छता मोहिमेमुळेच मुंबईतील हवेचा दर्जा सुधारतोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com