Mumbai News: विदर्भातील मतदानानंतर सर्व राजकीय पक्ष सजग; आता पुणे-मुंबईच्या टक्केवारीकडे लक्ष

Mumbai News
Mumbai Newssakal

Mumbai Loksabha: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी विदर्भातील पाचही मतदारसंघांमध्ये झाले. यंदा येथील मतदानाची टक्केवारी घटली आहे. याचा फटका नेमका कुणाला बसणार, यावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे. राजकारणाचा स्तर घसरल्याने निरुत्साह वाढला, असा निष्कर्ष राजकीय निरीक्षकांनी काढला आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होते. शनिवार-रविवारी साप्ताहिक युट्टी असल्याने अनेक जण बाहेर गेले असण्याचे एक कारण सांगितले जात आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये पुढील महिन्यात मतदान होणार आहे. त्या दिवशी सोमवारी असल्याने लोणावळा- खंडाळ्याला गेलेल्या मंडळींना मतदानासाठी परत आणण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पक्षांनी दिले आहेत.(pune loksabha latest Update)

Mumbai News
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न

‘रस्ते विकासपुरुष’ अशी ओळख असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर हा मतदारसंघ. तेथे २०१९ मध्ये ५४.९४ टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या निवडणुकीत तेथे प्रारंभिक अंदाजानुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेमतेम ४८ टक्के नोंदवले गेले होते. (nagpur loskabha election latest update)

उन्हाचा कहर हे त्यामागचे कारण असे सर्वसाधारण मत व्यक्त केले जात असले तरी गडकरींच्या ‘विकास संकल्पने’ला नकार हे कमी मतदानाचे कारण असल्याचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. पक्ष स्थितीत बदल करायचा नसेल तर मतदार निरुत्साही असतो, असे कारण देत आमचीच मंडळी मतदानासाठी बाहेर पडली असा दावा गडकरी करीत आहेत.(nitin gadkari)

रामटेक लोकसभेत तर मतदानाची टक्केवारी दहा टक्क्याने घसरली. तेथे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच रिंगणात नव्हता. भंडाऱ्यात सध्याच्या आकडेवारीनुसार मतदान गेल्या वेळच्या ६८.८१ टक्क्यांवरून ५६.८७ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. चंद्रपुरात तगडी झुंज असतानाही मतदान नऊ टक्क्यांनी घसरले.

Mumbai News
Pune News : कडूसच्या दक्षणा फौंडेशनमधील विद्यार्थ्यांना विषबाधा ; सुमारे शंभर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

गडचिरोलीत सर्वाधिक

पहिल्या टप्प्यातील सर्वाधिक मतदान ६४.९५ टक्के गडचिरोलीत झाले. पण तेही गेल्या वेळी नोंदविलेल्या ७२.३३ टक्क्यांपेक्षा कमीच आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागातील मतदार मतदानाचे कर्तव्य न निभावता गावाबाहेर जातात, याकडे लक्ष वेधले जाते आहे. निवडणूक आयोग वेळापत्रक ठरवत असताना या वास्तवाकडे काही अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले होते.

मुंबईतील मतदानाची चिंता

मुंबईत सर्वांत कमी मतदान होते. या भागात होणारे मतदान सोमवारी आहे. तेथे टक्केवारी चांगली कशी राहील, याकडे लक्ष देत सुट्टीवर जाणाऱ्या मतदारांना शहरातच थांबविण्याची व्यूहरचना करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्वच पक्ष पुढील टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीसाठी प्रयत्नाला लागले आहेत.

Mumbai News
Pune News : "कॅरिबॅगवर बंदी पण वापर खुल्लामखुल्ला", महापालिकेच्या आवाहनाला व्यावसायिकांचा ठेंगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com