Mumbai News
Mumbai Newssakal

Mumbai News: ठाकरेंचं टेंशन वाढणार? देसाईंच्या प्रचारात कॉंग्रेसचा असहकार

Mumbai News: दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटाचा उमेदवार ठरत नसल्याने या मतदारसंघांची अदलाबदल करावी, अशी कुजबुज दोन्ही मतदारसंघात सुरू झाली आहे.

दोन्ही पक्षांनी जास्त ताणू नये, वरिष्ठ नेत्यांनी सामोपचाराने या दोन जागांमधील तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे; मात्र ठाकरे गट देसाईंसाठी ठाम असून दक्षिण मध्य मुंबईत मात्र देसाई यांच्या प्रचारात कॉँग्रेसकडून असहकार असल्याचे दिसून येत आहे.(mumbai poltical news)

Mumbai News
Navi Mumbai: स्वीमिंग पूलमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; कोचवर गुन्हा दाखल

दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे रिंगणात आहेत, त्यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. त्यांची टक्कर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्याशी होत आहे. देसाई यांनीही येथे प्रचार सुरू केला आहे. गाठीभेटी सुरू केल्या आहेत; मात्र त्यांच्या प्रचारात काँग्रेस कुठेच दिसत नाही. देसाई हे आघाडीचे उमेदवार असून येथे अजूनही आघाडी दिसत नसल्याने आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे.(south central mumbai)

दक्षिण मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या. त्यांचे वडील कॉँग्रेसचे एकनाथ गायकवाड येथूनच खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यामुळे येथून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळावी, यासाठी कॉँग्रेसही आग्रही आहे; मात्र उत्तर मुंबई ठाकरे गटाने लढवावी आणि दक्षिण मध्य कॉँग्रेसला सोडण्याचा आग्रह कॉँग्रेसचे कार्यकर्ते करू लागले आहेत; मात्र ठाकरे गट देसाई यांच्यासाठी ठाम असल्याचे दिसून येत आहे. (congress mumbai seat)

Mumbai News
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न

दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा आणि माहीम या सहाही मतदारसंघात शेवाळे आणि देसाई यांचा प्रचार सुरू आहे. माहीमचे आमदार सदा सरवणकर हे शिंदे गटासोबत असल्याने त्याचा फायदा शेवाळेंना होईल.

मात्र चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा फायदा देसाई यांना होऊ शकेल, अशीही शक्यता आहे. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा वडाळा, भाजपचे कॅप्टन तमिळसेल्वन यांच्या सायन कोळीवाडा येथे शेवाळे यांनी जोर दिला आहे. तेथे शेवाळे यांना फायदा होण्याची शक्यता आहे; तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली, तर त्या शेवाळे यांना टक्कर देऊ शकतात, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Mumbai News
Mumbai News: किशोरी पेडणेकरांना दिलासा; उच्च न्यायालयाने दिला अटकपूर्व जामीन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com