कल्याण रेल्वे स्थानकामध्येही एकता दौड

मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती

कल्याण : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस देशभर साजरा करण्यात येत असून आज मंगळवार (ता. 31 ऑक्टोबर) रोजी सकाळी कल्याण रेल्वेस्थानकात रेल्वे प्रशासनाच्या वतीने एकता दौडीचे आयोजन करण्यात आले होते.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात आला, कल्याण रेल्वे स्थानकात आज मंगळवार (ता. 31 ऑक्टोबर) रोजी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. एकता दौड पूर्वी बिर्ला कॉलेजचे प्राचार्य डॉ नरेशचंद्र यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. यावेळी रेल्वे स्थानक मधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी, सुरक्षा बल, बिर्ला कॉलेज विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने सहभाग घेतला होता.

यावेळी सुरक्षा बलाच्या जवानांनी परेड मान्यवरांना सलामी दिली. तद्नंतर एकता दौडला कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास आणि प्राचार्य डॉ नरेशचंद्र यांनी हिरवा झेंडा दाखविला, कल्याण रेल्वे स्थानक मधील आरक्षित तिकीट घर पासून दौडला सुरुवात झाली तर ही दौड प्लेटफार्म 1 ते कसाराच्या दिशेने असलेल्या पादचारी पूल, स्कायवाक मार्गे सिद्धार्थ नगर व्हाया कल्याण पूर्व गणपती चौक मार्गे पुन्हा स्कायवाक आणि कल्याण रेल्वे मधील आरक्षित तिकीट घर येथे दौडचे समापन करण्यात आले.  

यावेळी कल्याण रेल्वे स्थानक स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगत मान्यवरांचे स्वागत केले तर बिर्ला कॉलेज प्राचार्य डॉ नरेशचंद्र यांनी आजचा दिवस खूप महत्वपूर्ण असल्याचे सांगत सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था सोबत देशातील सर्व सामान्य नागरिकाने लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या जन्म दिवस साजरा केला पाहिजे त्यासोबत त्यांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे, तर आजच्या पिढीला त्यांच्या विचारांची गरज असल्याचे मत यावेळी डॉ नरेशचंद्र यांनी व्यक्त केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: mumbai news kalyan dombivali sardar patel ekta daud