'विधी आणि वाणिज्य शाखेचा निकाल पंधरा ऑगस्टशिवाय लागणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई: मुंबई विद्यापीठातील निकालाच्या दिरंगाई प्रकरणी युवासेनेने आज (मंगळवार) आंदोलन केले. निकालाच्या दिरंगाईबाबत कारण स्पष्ट करताना विधी आणि वाणिज्य शाखेचे निकाल लागायला 15 ऑगस्टची तारीख उजाडणार अशी कबुली कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाकडून तिसरी नवीन डेडलाइन दिली गेल्याने आता युवासेना मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे.

यासह उत्तरपत्रिकांची पूनर्तपासणी मोफत केली जावी. निकालाबाबत माहिती मिळवण्यासाठी हेल्प डेस्क उभारला जावा. या सर्व गोंधळाची नैतिक जबाबदारी स्विकारत कुलगुरुंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवासेनेने कुलगुरूंना केली.

विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी हेल्प डेस्क लवकरच तयार केले जाईल तसेच पुरर्तपासणीचे दर कमी करण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: mumbai news law and commerce result and mumbai university