मीरा भाईंदरमध्ये कमळ फुलणार; भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण

सुशील आंबेरकर
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मीरा भाईंदरमध्ये 2012च्या निकालात भाजपला 31, राष्ट्रवादी (26), काँग्रेस (19), शिवसेना (14), मनसे (1) आणि बहुजन विकास आघाडी 3 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी हा क्रमांक दोनच पक्ष होता. पण 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अजून खातही उघडलं नाही. या निवडणुकीत अनेक राष्ट्रवादीचे नेते भाजपने आयात केले.

भाईंदर : मीरा भाईंदर निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी सुरू होताच भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे भाजपा मध्ये उत्साहाचे वातावरण होते.

मतमोजणी सुरु होताच मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. आपला उमेदवार किती मते घेणार याकडे लक्ष लावून होते. याच दरम्यान भाजपा, शिवसेना आणि कॉंग्रेसने लिड घेण्यास सुरवात केली. माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, माजी महापौर कैटलिन परेरा आदींसह राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले ध्रुव किशोर पाटील आणि शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले प्रशांत दळवी यांनी विजय मिळवला.

शिवसेना जाेरदार टक्कर देत आघाडी घेईल असे बोलले जात होते. महिन्याभराच्या प्रचारात भाजपपेक्षा शिवसेना अशी चर्चा होती. परंतु दुपारी 1 पर्यंतची परिस्थिती पाहता भाजपने सर्व चर्चेला धक्का दिल्याचे दिसून आले. दुपारी भाजप 29, शिवसेना 9, कॉंग्रेस 4 आणि अपक्ष 1 अशी आकडेवारी होती. त्यामुळे शिवसेनेला निम्मेही यश गाठता आले नसल्याचे चित्र होते.

मीरा भाईंदरमध्ये 2012च्या निकालात भाजपला 31, राष्ट्रवादी (26), काँग्रेस (19), शिवसेना (14), मनसे (0) आणि बहुजन विकास आघाडी 3 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी हा क्रमांक दोनच पक्ष होता. पण 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अजून खातही उघडलं नाही. या निवडणुकीत अनेक राष्ट्रवादीचे नेते भाजपने आयात केले.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: Mumbai news Mira Bhayandar Polls municipal corporation election