Mumbai News : कुर्ल्यात एसआरए इमारतीला भीषण आग, 39 रहिवाशांची सुटका

मात्र आगीच्या धुरामुळे घुसमटलेल्या 39 रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
mumbai
mumbaiSakal

मुंबई - कुर्ला पश्चिमेकडील एका एसआरए योजनेतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कुशलतेने इमारतीत अडकलेल्या 50 ते 60 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे.

मात्र आगीच्या धुरामुळे घुसमटलेल्या 39 रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून व्ही. बी. नगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. चांगली बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालय परिसरात असलेल्या डॉ भीमराव आंबेडकर आय गृहनिर्माण प्रकल्पाच्या एका इमारतीत शुक्रवारी रात्री 11.45 सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली होती. इमारतीला आग लागताच रहिवाशांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान स्थानिक विनोबा भावे नगर पोलीस आणि अग्निशमन दल माहिती मिळताच जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने अनेक रहिवासी ईमारतीत अडकले होते.

mumbai
Dr M S Gosawi Death : शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन

विनोबा भावे नगर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 12 व्या मजल्यापर्यंत जाऊन इमारतीत अडकलेल्या 50 ते 60 रहिवाशांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही.

mumbai
Cameroon Green GF : कशी दिसते कॅमरून ग्रीनची गर्लफ्रेंड?

मात्र धुरामुळे श्वास घुसमटल्याने 39 रहिवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 4 जणांना कोहिनुर आणि इतर 35 रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून व्ही. बी. नगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत

mumbai
Jaydev Unadkat : W, W, W, W, W, W... पृथ्वीनंतर आता जयदेवने इंग्लंडला लावलं वेड; लीस्टरशायरच्या तोंडचा घास पळवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com