डोंबिवलीत पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया 

मयुरी चव्हाण काकडे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

रविवारीही सकाळी डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात पुन्हा पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यामुळे  सुमारे 1 तास पाणी वाया जात होते. रविवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पाइपलाईनच्या एअर एका ट्रकने ठोकले असल्यामुळे वाल तुटला आणि पाईपलाईन फूटली असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

डोंबिवली : एकीकडे डोंबिवली शहरात पाणी टंचाईमूळे नागरीक त्रस्त झाले. तर दुसरीकडे शहरात वारंवार पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच्या घटना घडत आहेत.  

रविवारीही सकाळी डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात पुन्हा पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यामुळे  सुमारे 1 तास पाणी वाया जात होते. रविवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पाइपलाईनच्या एअर एका ट्रकने ठोकले असल्यामुळे वाल तुटला आणि पाईपलाईन फूटली असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

यावेळी सुमारे 10 ते 15 फुटापर्यंत पाणी कारंजासारखे उडत होते. अखेर महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचल्यावर पाणी पुरवठा बंद करून पाईपलाईच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Mumbai news water pipeline broke in Dombivali