'५० ग्रॅम पावडर खिशात टाकेल, आयुष्य उद्ध्वस्त होईल'; मुंबई पोलिसांचा व्हायरल VIDEO, नेमकं खरं काय?
Mumbai Police Viral Video: मुंबई पोलिसांकडून काही मुलांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमचं पूर्ण आयुष्य वाया जाईल, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मुंबई पोलीस पुन्हा चर्चेत आले आहेत. काही मुलांशी बोलताना एक पोलीस अधिकारी त्यांना '५० ग्राम पावडर खिशात टाकेल' अशी गंभीर धमकी देत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते.