esakal | कोण आहेत संजय राऊत यांचे जावाई? राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा संपन्न
sakal

बोलून बातमी शोधा

कोण आहेत संजय राऊत यांचे जावाई? राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा संपन्न

शिवसेना नेते संजय राऊत यांची कन्या पूर्वेशी हिचा साखरपुडा मल्हार नार्वेकर यांच्याशी आज झाला. 

कोण आहेत संजय राऊत यांचे जावाई? राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा संपन्न

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई  ः शिवसेनेचे फायरब्रँड नेते व दै. सामना चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबात आता जावयाचे आगमन झाले आहे. त्यांची कन्या पूर्वेशी हिचा साखरपुडा मल्हार नार्वेकर यांच्याशी आज झाला. 

भारताच्या राजकारणात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अनेक जावयांनी आपल्या सासऱ्यांची व सासूची देखील कोंडी केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे जामातो दशमो ग्रहः हे वाक्य भारतीय राजकारण्यांना अचूक लागू होते, असे गमतीत म्हटले जाते. एरवी आपल्या `संजया`च्या दिव्यदृष्टीने राजकारणात अचूक डावपेच रचणारे, मर्मभेदक वक्तव्ये आणि मार्मिक लेखाबद्दल प्रसिद्ध असणारे संजय राऊत यांना सध्या ईडी च्या पीडेने ग्रासले आहे. अशा स्थितीत या दहाव्या ग्रहाच्या आगमनामुळे त्यांच्यामागची ही पीडा जाईल का, अशी गमतीदार चर्चाही आता सुरु झाली आहे. 

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

आज एका आलिशान पंचतारांकित हॉटेलात दोन्हीकडच्या मर्यादित कुटुंबियांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे हजर होत्या. त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शनला सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांनी तसेच राज्य मंत्रीमंडळातील सदस्यांनी हजेरी लावली होती. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी एकमेकांना दिलखुलास मिठी मारली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाह्याने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही न भूतो न भविष्यती अशी युती घडवून आणणारे राऊत यानिमित्ताने काही नव्या ग्रहांची युती घडवून आणतील का अशीही खुमासदार चर्चा यानिमित्ताने झाली. 

सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मल्हार हे आयटी अभियंते असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. तर पूर्वेशी या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करीत आहेत. मल्हार यांचे वडील राजेश नार्वेकर हे वरिष्ठ सनदी अधिकारी असून ते सध्या ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. ते दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सहसचिव होते. तर त्यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात तसेच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. रायगड जिल्हा हागणदरीमुक्त करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. तर रत्नागिरी जिल्ह्यात काम करताना त्यांनी स्वच्छ भारत व पंतप्रधान आवास योजना राबवल्या होत्या. ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून त्यांनी काही कठोर उपाययोजना राबविल्या होत्या.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai political news Sanjay Rauts daughter Purveshi had a engage with Malhar Narvekar