Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसानं अंधेरीचा सबवे बंद; तिन्ही मार्गावरील लोकल धावताहेत विलंबानं

मुंबईत शनिवारी (ता. २४) सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा रेल्वे आणि रस्ते मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
Andheri Subway Close
Andheri Subway Closesakal

मुंबई - मुंबईत शनिवारी (ता. २४) सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा रेल्वे आणि रस्ते मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या; तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे पहिल्याच पावसाचा नोकरदार वर्गाला फटका बसला असून लेटमार्क लागला.

चेंबूर, दादर, सायन, सायन - पनवेल महामार्ग, वाशी टोलनाका या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा वेग मंदावला. पावसाचे पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, वाहतूक व्यवस्था एस. व्ही. रोडच्या दिशेने वळवण्यात आली आहे. पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे उशिराने धावत होती.

यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर १२ ते १५ मिनिटे, मध्य रेल्वे मुख्य मार्गावर १५ ते २० मिनिटे आणि हार्बर मार्गावर ८ ते १० मिनिटे लोकलसेवा उशिराने धावत असल्याचे चित्र दिसून आले. लोकल सेवा उशिराने धावत असल्याने घरी परतणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर वाट पाहत ताटकळत बसावे लागले. तसेच, रविवारी ब्लॉक असल्याने लोक खरेदीसाठी आजच बाहेर पडले होते; पण पहिल्या पावसाचा त्यांनाही फटका बसला.

Andheri Subway Close
Mumbai News : ड्रेनेज लेनची सफाई करताना गोवंडीत दोन कामगारांचा मृत्यू

दरम्यान, पावसामुळे दृश्यमानता कमी होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोटरमन आणि लोको पायलटला रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळे लोकल आणि रेल्वे गाड्यांच्या वेगावर बंधने येतात, असे सांगितले जात आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

वाहतूक मंदावली

पहिल्यात पावसात शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. अंधेरी सब-वे या भुयारी मार्गात पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मुंबई वाहतूक पोलिस आणि महापालिकेने वाहतुकीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

अंधेरी पूर्व येथील असल्फा साकीनाका जंक्शन येथे पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक मंदावली होती. वरळी सी-लिंक गेटजवळील गफार खान रोडवर पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक धीम्या गतीने होती. तसेच पाणी साचल्याने बीडी रोड, महालक्ष्मी मंदिराजवळ परिसरात वाहनांची रांग लागली होती.

Andheri Subway Close
Mumbai Crime : वांद्र्याच्या पबमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; 7 जणांना अटक

पावसाची नोंद

  • शहर - ६५.६० मिमी

  • पूर्व उपनगर - ६९.८६ मिमी

  • पश्चिम उपनगर - ७३.५७ मिमी

११ ठिकाणी झाडे पडली

जोरदार पावसामुळे मुंबईत पडझडीच्या घटना घडल्या. यामध्ये शहरात ४, पूर्व उपनगरात २ व पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १५ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या; तर एका ठिकाणी घराचा काही भाग कोसळला. काही ठिकाणी शॉर्ट सर्किटच्याही घटना घडल्या.

येथे पंप लावले -

जोरदार पावसामुळे दादर टीटी, सायन रोड क्रमांक २४, टिळक नगर, अंधेरी सबवे, दहिसर सबवे येथे पाणी साचल्याने पालिकेने येथे पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निचरा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com