कोरोनाची तिसरी लाट फक्त मुंबईतच येणार का?

व्यापारी संघटना निर्बंधांमुळे त्रस्त
mumbai traders
mumbai traderssakal

मुंबई - राज्य शासनाच्या निकषांनुसार आता कोरोना(Corona) रुग्णांची संख्या कमी झाल्याने मुंबई(Mumbai) खरे पाहता पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात आली आहे. तरीही खबरदारी(Precautions) म्हणून मुंबईला अद्याप तिसऱ्या टप्प्यात ठेवल्यावरून व्यापारी(Traders) तसेच हॉटेलचालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.(Mumbai traders unhappy about state government rules of lockdown in Mumbai)

कोरोनाची तिसरी लाट फक्त मुंबईतच येणार आहे, असे प्रशासनाला वाटते का, असा प्रश्न फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी विचारला आहे. तर द इंडियन हॉटेल अँड रेस्टोरंट असोसिएशन (आहार) च्या शिष्टमंडळाने नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या. या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढण्याची विनंतीही शिष्टमंडळाने पवार यांना केल्याचे आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.

mumbai traders
प्रताप सरनाईकांची उच्च न्यायालयात धाव

शासकीय निकषांनुसार मुंबई पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात असूनही तिला तिसऱ्या टप्प्यातच ठेऊन कठोर निर्बंध कायम ठेवले आहेत. अशा स्थितीत व्यवसायाला कमी वेळ मिळत असल्यामुळे मॉल-दुकानदार-व्यापारी, हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. मुंबईच्या शेजारील शहरांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले तरी मुंबईतील निर्बंध तसेच असल्याने हा भेदभाव कशासाठी, असाही प्रश्न ते विचारीत आहेत. तर मुंबई पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात येऊनही अद्याप हॉटेल-रेस्टोरंट पूर्वीप्रमाणे दिवसभर उघडण्यास परवानगी नसल्याबद्दल हॉटेल अँड रेस्टोरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया तर्फेही निराशा व्यक्त करण्यात आली आहे. अद्यापही हॉटेलांच्या वेळा निश्चित नसल्याने हॉटेलांचे कामकाज, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात अडचणी येत असल्याचेही असोसिएशनचे अध्यक्ष शेरी भाटिया यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com