आता नवी मुंबईतच स्वॅब चाचणी; आठवडाभरात प्रयोगशाळा सुरु होणार...

सुजित गायकवाड
Friday, 31 July 2020

कोरोना चाचणी करीता घेतलेल्या स्वॅबचे तात्काळ अहवाल उपलब्ध करून देणाऱ्या अत्याधुनिक तंत्र महापालिकेने खरेदी केले आहेत. कोरोना गेल्यानंतर इतर आजारांचेही चाचणी या प्रयोगशाळेत करणे शक्य होणार आहे.

नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर आळा बसवण्यासाठी महापालिकेतर्फे मोठी पावले उचलण्यात आली आहेत. महापालिकेतर्फे तयार करण्यात येत असलेल्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आठवडाभरात ही प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. या प्रयोगशाळेमुळे दररोज एक हजार नमुन्यांचे अहवाल महापालिकेला 24 तासांमध्ये प्राप्त होणार आहेत.  

औषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...

नवी मुंबई शहरात वाढणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. राज्य सरकारने अगदी आयुक्त बदलूनही फारसा उपयोग झालेला दिसून येत नाही. तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या कार्यकाळात कोरोनाचे असणारे प्रमाण अभिजीत बांगर यांच्या काळातही जैसे थेच आहे. परंतु मिसाळ यांच्या काळातील प्रकल्पांना बांगर आल्यापासून गती मिळाली आहे. वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयातील प्रयोगशाळेचा प्रयत्न जागेमुळे फसल्यानंतर आता नेरूळच्या मीनाताई ठाकरे माताबाल रुग्णालयात कोरोनाची पहिली प्रयोग शाळा साकारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत तब्बल 11 कोटी रूपये खर्च करून यंत्रणा उभारण्यात आली आहे. 

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...​

कोरोना चाचणी करीता घेतलेल्या स्वॅबचे तात्काळ अहवाल उपलब्ध करून देणाऱ्या अत्याधुनिक तंत्र महापालिकेने खरेदी केले आहेत. कोरोना गेल्यानंतर इतर आजारांचेही चाचणी या प्रयोगशाळेत करणे शक्य होणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये सर्व आवश्यक यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेकडे स्वतःचे तंत्रज्ञ नसल्यामुळे ही प्रयोगशाळा बाह्ययंत्रणेद्वारे चालवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. महापालिकेला हे तंत्रज्ञ उपलब्ध झाल्यानंतर आयसीएमआरची अंतिम मान्यता मिळाल्यावर आठवडाभरातच प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे. 

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेतेमंडळींसोबत नेरूळ मधील रुग्णालयात तयार करण्यात येत असलेल्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेची पाहणी केली. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रयोगशाळेची माहिती उपस्थितांना समजून सांगितली. या प्रयोगशाळेनंतर अपोलो रुग्णालयात घेण्यात आलेल्या प्लाझ्मा डोनेशन शिबीराला शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला...

प्रतिक्षा संपणार
नवी मुंबई महापालिकेतर्फे कोरोना चाचणीकरीता घेतले जाणारे स्वॅब मुंबईतील हापकिन्स इन्सिट्यूट, जे.जे. रुग्णालय आणि इतर सरकारी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी जातात.  स्बॅब पाठवल्यानंतर त्याची पडताळणी करून चाचणीचा अहवाल येण्यास काही दिवसांचा कालावधी जातो. तोपर्यंत बाधित रुग्ण त्याच्या संपर्कात येणाऱ्या अनेक नागरिकांना संसर्गाची लागण करतो. मात्र आता स्वतः पालिकेची प्रयोगशाळा होणार असल्याने तात्काळ अहवाल प्राप्त होणार आहेत.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new corona labouratory will starts within week in navi mumbai