पहिल्याच दिवशी रेल्वेची तब्बल 'इतकी' तिकिटे आरक्षित; 1 जूनपासून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची यादी जाहीर 

पहिल्याच दिवशी रेल्वेची तब्बल 'इतकी' तिकिटे आरक्षित; 1 जूनपासून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची यादी जाहीर 


मुंबई : कोरोना संकटात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी जाता यावे, यासाठी भारतीय रेल्वे 1 जूनपासून 200 विशेष गाड्या सोडणार आहे. या गाड्यांचे ऑनलाईन आरक्षण गुरुवारी (ता.21) सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाले. अवघ्या तीन तासांमध्ये या गाड्यांची 1 लाख 80 हजार तिकिटे आरक्षित झाली. विशेष म्हणजे एका दिवसातच 20 जूनपर्यत उत्तर प्रदेश, बिहार राज्यात जाणाऱ्या 76 गाड्यांचे तिकीट आरक्षित झाल्या आहेत. या गाड्यांसाठी कमाल 30 दिवसांपूर्वी आरक्षण करता येणार आहे.

1 जूनपासून देशातील वेगवेगळ्या भागातून 200 रेल्वे धावणार आहेत. मुंबईतील सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून रेल्वे सुटणार आहे. या गाड्यांना एसी, नॉन एसी आणि जनरल द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहे. या गाड्यांमध्ये दिव्यांग आणि वैद्यकीय प्रमाणपत्र असणाऱ्यांना सवलत देण्यात आलेली आहे. या गाड्यांमध्ये प्रवाशांना अन्नपदार्थ, ब्लॅकेट, उशी आदी सुविधा पुरविण्यात येणार नाही. 

रेल्वे प्रवाशांसाठी नियम
रेल्वे प्रवाशांना प्रवासाच्या वेळेच्या किमान 1 तास आधी स्टेशनवर यावे लागेल. प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी होईल. या तपासणीनंतर परवानगी मिळाल्यास त्याला प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक असून रेल्वेस्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
 

मुंबईतुन सुटणाºया गाड्या
 01016-15 एलटीटी-गोरखपुर कुशीनगर एक्सप्रेस, 
01019-20 एलटीटी-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, 
10161-62 एलटीटी-दरभंगा एक्सप्रेस, 
01071-72 एलटीटी-वाराणसी कामायनी एक्सप्रेस, 
01093-94 सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्सप्रेस, 
01139-40 सीएसएमटी- गडग एक्सप्रेस, 
01301-02 सीएसएमटी-केएसआर बेंगळूरु उद्यान एक्सप्रेस, 
02479-80 बांद्रा टर्मिनस-जोधपुर सूर्यनगरी एक्सप्रेस, 
02533-34 सीएसएमटी-लखनऊ पुष्पक एक्सप्रेस,
02701-02 सीएसएमटी-हैद्राबाद हुसेनसागर एक्सप्रेस, 
02810-09 सीएसएमटी-हावडा मेल, 
02903-04 मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल मेल, 
02926-25 बांद्रा टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्सप्रेस, 
02933-34 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद कर्नावती एक्सप्रेस, 
06345-46 एलटीटी-तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस, 
02955-56 मुंबई सेंट्रल-जयपुर एक्सप्रेस, 
03201-02 एलटीटी-पटना एक्सप्रेस, 
02141-42 एलटीटी-पाटलीपुत्र एक्सप्रेस, 
09041-42 बांद्रा टर्मिनस-गाजीपुर एक्सप्रेस, 
02541-42 एलटीटी-गोरखपुर एक्सप्रेस, 
02149-50 पुणे-दानापुर एक्सप्रेस, 
05645-46 एलटीटी-गुवाहाटी एक्सप्रेस 
09037-38 बांद्रा टर्मिनस-गोरखपुरअवध एक्सप्रेस, 
09039-40 बांद्रा टर्मिनस-मुझ्फरापुर अवध एक्सप्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com