पालघर पोलिसांनी पकडले 40 कोटीचे ड्रग

पालघर पोलिसांनी पकडले 40 कोटीचे ड्रग

पालघरः पालघर जिल्ह्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने तलासरी तालुक्यातील दपचारी भागात एका घरावर छाप टाकून सुमारे 40 कोटी रुपयांचे ड्रग हस्तगत केले आहे. अलीकडच्या काळातील हा एक मोठा छापा असून या प्रकरणातील 3 आरोपी मात्र फरार झाले आहेत.

गेल्या आठवड्यात नालासोपारा (वसई) मध्ये अफिडेन या ड्रगच्या व्यहारात पकडलेल्या तीन आरोपींच्या कडून मिळालेल्या महतीवरून पालघर गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी (ता. 3) दपचारी दुग्ध प्रकल्पाच्या क्षेत्रात 10 गुंठे क्षेत्रफळात असलेल्या घरावर छापा टाकला. त्या वेळी सुमारे 26 कोटी रुपये किमतीचे 5.2 किलो हेरॉईन, 24.69 किलो एमडीएम तसेच 4 कोटी रुपये किमतीचे अन्य ड्रग पोलिसांनी हस्तगत केले. याच बरोबर कर्नाटक पाससिंग ची एक फॉरतूनर गाडी पोलिसांनी दपचारी येथून पकडली.

पालघर जिल्ह्यात ड्रगचे उत्पादन होत नसल्याचा दावा करत उपलब्ध होणाऱ्या माहिती वरून ड्रग माफिया विरुद्ध पालघर पोलिस कारवाई करीत असल्याचे पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पालघर पोलिसांकडून ड्रग विरोधात याच प्रकारे कारवाई सुरू ठेऊ व या कामी नागरिकांनी माहीत मिळाल्यास पोलिसांना देण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com