पालघर : सफाळेत विद्यार्थांनी साजरे केले वृक्षाबंधन

प्रमोद पाटील
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

विद्यालयाच्या आवारात पर्यावरणाविषयी संदेश लिहिलेले फलक सगळ्यांच्या आकर्षणाचा बिंदु ठरला. विद्यालयाच्या हरित सेनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या प्रमुख म्हणून मिताली मोहिते यांनी काम पाहिले.

सफाळे : येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या भाऊ आणि बहिणीच्या अतूट नाते संबंध जपणारया रक्षाबंधनाच्या निमित्ताने सफाळे येथील विराथन येथील अभिनव विद्यालयात आज (शनिवार) वृक्षाबंधन हा आगळावेगळा समारंभ पार पडला.

या वेळी विद्यार्थ्यांनी घरीच स्वतः बनविलेल्या राख्या वृक्षांना बांधून विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयी असलेले आपलं प्रेम, आपुलकी व्यक्त केली. तसेच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला.

विद्यालयाच्या आवारात पर्यावरणाविषयी संदेश लिहिलेले फलक सगळ्यांच्या आकर्षणाचा बिंदु ठरला. विद्यालयाच्या हरित सेनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या प्रमुख म्हणून मिताली मोहिते यांनी काम पाहिले. या वेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, कला शिक्षक महेंद्र पाटील, वैभव पाटील, जयश्री घरत, मनाली म्हात्रे व  इतर शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Palghar news raksha bandhan celebration in Saphale