फाईल फोटो
फाईल फोटो

कोरोनाच्या लढ्यात पिंक आर्मी मैदानात

ठाणे : कोरोनाच्या लढ्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी अग्रेसर राहात अंगणवाडी, सेविका अर्थात पिंक आर्मी कोरोनाची लढाई लढत नित्याच्या सेवाही निरंतर देत आहेत.  

ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प राबवला जातो. जिल्ह्यात एक हजार 854 अंगणवाड्या कार्यरत असून शून्य ते सहा वयोगटातील एक लाख 30 हजार बालके आणि 21 हजार स्तनदा, गरोदर किशोरवयीन मुलींना सेवा पुरवण्यात येत आहे. याकाळात सहा महिने ते तीन वर्षापर्यंतची बालके, गरोदर व स्तनदा माता, व 11 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुली यांना महिन्यातील 25 दिवसांसाठी घरपोच आहार पुरविण्यात येत असून अंगणवाडी सेविका गृहभेटी देऊन आहार देत आहेत. तीन ते सहा वर्षे वयोगटातील अंगणवाडीत जाणाऱ्या बालकांना सध्या अंगणवाड्या तात्पुरत्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद असल्याने पूरक पोषण आहार 15 जुलैपर्यंत घरपोच दिला जाणार आहे. 

याशिवाय पात्र बालकांचे लसीकरण केले जात असून अंगणवाडी सेविका, आशा, एएनएम यांचे सातत्यपूर्ण प्रयन्त दिसून येत आहेत. गृह भेटीद्वारे बालकांच्या आरोग्य बाबत विचारपूस, कुपोषित बालकांना अतिरिक्त आहार दिल्याचे खातरजमा करणे, कोरोना संबंधित लोकांमध्ये जनजागृती, रुग्ण आढळून आल्यास त्या क्षेत्रात सर्वेक्षणात सहभाग आदी दैनंदिन कामे अंगणवाडी सेविका पार पाडत आहेत. 

महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या गटांतील आदिवासी क्षेत्रात गरोदर, स्तनदा माता व सहा वर्षांपर्यंतची बालके असणाऱ्या 1 हजार 820 आदिवासी कुटुंबांना 4.5 टन अन्न ( जे शिजवल्यानंतर 22.5 टन), 7.2 टन तेल डाळी मसाले इत्यादी जीवनावश्यक वस्तू 720 कुटुंबियांना वाटप करण्यात आले. यामध्ये रिलायन्स फाऊंडेशन, जिंदाल स्टील वर्क्स, लायन्स क्लब जुहू, रोटरी क्लब ठाणे कल्याण या स्वयंसेवी संस्थांचे व ट्रस्टचे सहकार्य लाभले. मिळालेल्या मदती या अमुल्य असून कुपोषणाच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक गोष्टी दरम्यानच्या कालखंडात दिसून येत असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी( महिला व बाल विकास) संतोष भोसले यांनी सांगितले. 

डिजीटल शिक्षणाचा प्रयोग
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत डिजिटल साधनांच्या वापराद्वारे पूर्व शालेय शिक्षण देण्याचा अभिनव प्रयोग करण्यात येत आहे. पालक प्रेरणा उपक्रमाअंतर्गत पालकांचे व्हाट्सअप ग्रुप पूर्ण जिल्हाभर करण्यात आलेले असून 'प्रथम' या एनजीओच्या सहाय्याने नियमितपणे वेळापत्रकानुसार घटकनिहाय व क्षेत्रनिहाय कृती पालकांपर्यंत पोहोचवल्या जातात व त्याद्वारे पालक कृती करून घेता असून यामध्ये पालकांचा सहभाग व प्रतिसाद उत्कृष्ट प्रकारचा असल्याची माहिती महिला व बालविकास विभाग संतोष भोसले यांनी दिली.

कोणत्याही परिस्थितीत न डगमगता काम करण्याची वृत्ती अंगणवाडी सेविका, मदतनीस पर्यवेक्षिका यांच्यात दिसून येते. सामाजिक बदलांसाठीचे एक प्रमुख परिणामकारक माध्यम म्हणून महिला व बालविकास निरंतर कार्यरत आहे. 
- हिरालाल सोनवणे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

Pink Army on ground in the battle of Corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com