धक्कादायक ! नवी मुंबईतील 'या' भागात क्वारंटाईन केलेले नागरिक रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने क्वारंटाईन केलेल्या रहिवासी इमारतींमधील नागरिक सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत.

नवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने क्वारंटाईन केलेल्या रहिवासी इमारतींमधील नागरिक सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. पोलिस आणि पालिका प्रशासनाने अशा नागरिकांवर निर्बंध टाकण्याची जबाबदारी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांवर टाकून निर्धास्त बसले आहेत. त्यामुळे हे नागरिक घराबाहेर पडून कोरोना बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मोठी बातमी : प्रा. तेलतुंबडे यांना जामीन नाहीच, 8 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

खारघर परिसरातील सेक्टर ३६ आणि सेक्टर १५ या दोन्ही ठिकाणी आत्तापर्यंत कोरोबाधित असणारे चार रूग्ण सापडले आहेत. हे रूग्ण ज्या सोसायट्यांमध्ये सापडले आहेत, त्या सोसायट्यांमधील रहिवाशांना बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी अडचणी येत आहेत. याशिवाय, इमारतींमधील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी अथवा साधी विचारपूसही महापालिकेचे अधिकारी घेताना दिसत नाहीत. 

खारघर सेक्टर ३६ येथील एका सोसायटीच्या इमारतीमधील पोलिस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्यावर इमारत क्वारंटाईन करण्यात आली; परंतु त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मागे फिरकून त्या इमारतीकडे पाहिलेही नाही. या इमारतीमध्ये 20 कुटुंबे आहेत. ते क्वारंटाईनचे सर्व नियम पाळत असताना एक पोलिस अधिकारी महिला स्वतःचे पाळीव प्राणी घेऊन रोज घराबाहेर फिरायला जात असते. तिला सुरक्षा रक्षकांनी अडवल्यावर पोलिसी रुतबा त्याच्यासमोर दाखवून त्यांनाच गप्प बसवत आहे. त्यामुळे या इमारतीमधील नागरिक घाबरले असून कारवाईची मागणी केली आहे. 

हे ही वाचा :  पाकिस्तानी अधिकाऱ्यालाही 'या' भारतीय वैमानिकाचं कौतुक करण्यावाचून राहवलं नाही, वाचा असं काय घडलं...

सोसायटीतील नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची कोव्हिड-१९ चाचणी केली असता सर्व निगेटिव्ह आले आहेत. रहिवाशांना काही लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क करावा. 
- संजय शिंदे, उपायुक्त, आरोग्य विभाग महापालिका  

नक्की वाचा आता विनाकारण घराबाहेर फिराल तर हवेत उडणारे पोलिस लागतील मागे...

नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न
नवी मुंबई महापालिकेने शहरातील क्वारंटाईन केलेल्या रहिवासी इमारतींमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू नये म्हणून व्यवस्था केली आहे. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता येईल, अशा पुरवठादारांचे संपर्क क्रमांक पालिकेच्या संकेतस्थळावर दिले आहेत. सोसायटीतील नागरिकांची रोजच्या रोज विचारपूस करण्यासाठी; तसेच नजर ठेवण्यासाठी अॅप्सही तयार केला आहे. त्यामुळे शहरातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या अडचणी दूर केल्या आहेत.
 

Quarantined civilians on the streets Neglect of police, municipal administration in Kharghar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantined civilians on the streets Neglect of police, municipal administration in Kharghar