मुंबई लोकल रेल्वे स्थानकाच्या बांधकामात १४९ घरांचा अडथळा, कुटुंबांना रेल्वेकडून नोटीस; बेघर होण्याची शक्यता

Mumbai Local New Railway Station Work: ठाणे-मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. मात्र यामध्ये १४९ घरांचा अडथळा येत असून त्या घरांना रेल्वे प्रशासनाने पाडकामाच्या नोटिसा बजावल्या आहेत.
Railway Administration Demolition notice

Railway Administration Demolition notice

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे-मुलुंडदरम्यान होणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी नौपाड्यातील बांदल चाळ परिसरातील तब्बल १४९ घरांचा अडथळा आला आहे. या घरांना रेल्वे प्रशासनाने पाडकामाच्या नोटिसा बजावल्याने येथील कुटुंबांवर बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे पाच दशकांपासून वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, सुनावणीसाठी ७ मेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com