

मुंबई : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर निकालाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'अविश्वसनीय! तूर्तास एवढेच...' अशी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच ते या निवडणुकांच्या निकालावर बोलते झाले. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आचरकेर सरांचे लाडके शिष्य असलेले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे भारतीय क्रिकेटमधील दिग्गजही उपस्थित होते.