
Rajan Salvi Enters in ShivSena : आत्तापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असलेले राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोठ्या शक्तीप्रदर्शनासह शेकडो कार्यकर्त्यांसह साळवी यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत हे उपस्थित होते. यावेळी ठाकरेंचा पक्ष सोडतोय यामुळं डोळ्यात अश्रू असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर आपल्या मनातली खदखदही त्यांनी बोलून दाखवली.