खुशखबर..! रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच मिळणार 'ही' सुविधा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

मंगळवारी (ता.18) सादर झालेल्या अर्थसंकल्पात परिवहन व्यवस्थापनाने कोपरखैरणे, घणसोली, रबाळे रेल्वेस्थानकापासून औद्योगिक क्षेत्रात (एमआयडीसी) मिनी बस सेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

नवी मुंबई : मंगळवारी (ता.18) सादर झालेल्या अर्थसंकल्पात परिवहन व्यवस्थापनाने कोपरखैरणे, घणसोली, रबाळे रेल्वेस्थानकापासून औद्योगिक क्षेत्रात (एमआयडीसी) मिनी बस सेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागातून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. 

ही बातमी वाचली का? शोएब अख्तरचे भारत-पाकिस्तानबद्दल मोठे विधान

ठाणे-बेलापूर पट्ट्यात मोठमोठी कॉर्पोरेट कार्यालये, कारखाने, उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. ट्रान्स हार्बर मार्गाद्वारे मुंबई, ठाण्यातून कामानिमित्त येथे येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. मात्र, या पट्ट्यातील एमआयडीसी क्षेत्राकरिता रेल्वेस्थानकांपासून अंतर्गत भागात बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना रिक्षा वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. काही वर्षांपूर्वी या परिसरात बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, स्थानिक रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे परिवहन व्यवस्थापनाला ही सेवा बंद करावी लागली. दिघा ते बेलापूर मार्गावर रोज सुमारे 35 हजारांहून अधिक रिक्षा धावतात. यातील 40 टक्के रिक्षा स्थानिकांच्या आहेत. बसचा पर्याय उपलब्ध नसल्याने रेल्वेस्थानकापासून कामाच्या ठिकाणापर्यंत अगदी 20 ते 40 रुपये खर्चून रिक्षाने प्रवास करतात. याशिवाय रिक्षाचालकांना 'मीटर'नुसार भाडे आकारणे चालत नसल्याने स्वतंत्र प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे उकळले जाते. त्यामुळे परिवहन व्यवस्थापनाचा रेल्वेस्थानक ते एमआयडीसी मिनी बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रवाशांकरता दिलासा देणारा ठरणार आहे. याविषयी परिवहनचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले की, शहरात बऱ्याच ठिकाणी सिडको वसाहतींमध्ये बस सेवा सुरू आहेत. जसे नेरूळ सीबीडीहून उलवे, खारघर, मानसरोवर. काही ठिकाणी अंतर्गत मार्गावरील फेऱ्या वाढवणे; तर काही नवे मार्ग सुरू करण्याचा विचार करत आहोत. 

ही बातमी वाचली का? नवी मुंबईत हजारो आंदोलकांची धरपकड; वाचा नेमकं काय झालं?

एसी इलेक्‍ट्रिक बस 
परिवहनच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या 100 इलेक्‍ट्रिक बस वातानुकूलित (एसी) असतील. त्या ज्या मार्गावर धावतील, तिथे जलद सेवा देण्याचा प्रयत्न असेल. एखाद्या मार्गावर 50 थांबे असतील. तर तेथील जास्त प्रवासी असलेल्या थांब्यांना आपण प्राधान्य देणार आहोत. 

ही बातमी वाचली का? कवितांनी फुलले हास्याचे कारंजे

एसी बसचे तिकीट दर कमी होणार? 
बेस्टने तिकीट दर कमी केल्याने एनएमएमटीला होणारा तोटा भरून काढण्यासाठी परिवहनमार्फत काही पर्यायांचा विचार केला जात आहे. सध्या नॉन एसी बसचे तिकीट दर कमी करण्याचा विचार नाही. मात्र, एसी बसचे तिकीट दर कमी केल्यास काही फरक पडेल का? याचे सर्वेक्षण, अभ्यास सुरू आहे. त्याबाबत येणाऱ्या निष्कर्षानुसर निर्णय घेण्यात येणार आहे. 

कोपरखैरणे, घणसोली, रबाळे येथे मिनी बस सेवा सुरू करत आहोत. त्याकरिता 10 मिनी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. ही सेवा सुरू होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागेल. 
- शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, परिवहन विभाग. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soon NMMT's mini bus service in navi mumbai