esakal | बेस्ट उपक्रमातील 'एसटी'ची सेवा रविवारपासून बंद
sakal

बोलून बातमी शोधा

ST bus

बेस्ट उपक्रमातील 'एसटी'ची सेवा रविवारपासून बंद

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: मुंबईकरांना प्रवासी सेवा देणारी बेस्ट (BEST) उपक्रमातील एसटीच्या (ST Buses) बसेसची सेवा रविवारपासून बंद केली जाणार आहे. बेस्ट प्रशासनाने एसटी महामंडळाला तशा सूचना दिल्या असून टप्याटप्याने बसेसची संख्या कमी केल्यानंतर सध्या फक्त 250 बसेस बेस्ट उपक्रमात सेवा (Transport Service) देत होत्या. त्याही रविवारपासून आपआपल्या डेपोत परत पाठवण्याच्या सूचना एसटी महामंडळाने दिल्या आहेत. यातून आतापर्यंत सुमारे 350 कोटींचे उत्पन्न (Income) ST प्रशासनाने मिळवल्याची माहिती आहे. (ST services under BEST Bus Project to stop from Sunday)

हेही वाचा: विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंत तर... -आशिष शेलार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना प्रवासी सेवा देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने गेल्यावर्षी एसटीच्या एक हजार बसेसची मागणी केली होती. त्यानुसार राज्यभरात डेपो स्तरावरील बसेससह कर्मचाऱ्यांना ऐन कोरोना महामारीच्या काळात मुंबईत कर्तव्यावर बोलविण्यात आले होते. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना 8 हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली तर सुमारे 245 कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा: "जिनके अपने घर शिशे के होते है..."; कोर्टाने परमबीरना सुनावलं

कोरोनाकाळात राज्यातील एसटीची सार्वजनिक प्रवासी सेवा बंद होती. त्यामुळे सुमारे 8 हजार कोटी पेक्षा जास्त उत्पन्नाचा फटका बसला, मात्र बेस्ट उपक्रमातील प्रवासी सेवेमुळे काहीप्रमाणात एसटी महामंडळाला उत्पन्न मिळवता आले आहे. त्यानंतर आता ही सेवा रविवार पासून पूर्णपणे बंद होणार असल्याची घोषणा एसटी महामंडळ प्रशासनाने केली आहे.

हेही वाचा: माझं गटार माझी जबाबदारी; मनसेचा शिवसेनेवर जिव्हारी लागणारा वार

टप्याटप्याने बसेसची संख्या घटली

गेल्यावर्षी कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित केल्याने सर्वसामान्यांना किंवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासी सेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रमात एसटी बसेसचा वापर करण्यात आला, त्यासाठी सुरुवातीला एक हजार बसेस बोलविण्यात आल्या होत्या. त्यानंतर 500 बसेस रद्द करून फक्त 500 बसेस चलनात होत्या. त्यानंतर आता फक्त मुंबई, ठाणे, पालघर येथील 250 बसेस मुंबईकरांना सेवा देत होते.