Street Dog News: डोंबिवलीत भटक्या श्वानांची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ठराविक भागात त्यांचा वावर जास्त असल्याचे दिसून येते | The number of these stray dogs is increasing day by day and it is seen that their movement is more in certain areas
Street Dog News
Street Dog News

Dombivli News: कल्याण डोंबिवली शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डोंबिवली निवासी भागातील दोन ज्येष्ठ नागरिक व सुनील नगर परिसरातील एका तरुणीला भटक्या श्वानानी चावा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

शहरातील अनेक भागात हे श्वानांचे झुंडच्या झुंड फिरत असतात. रस्त्याने पायी चालणारे प्रवासी तसेच दुचाकी स्वारांवर अनेकदा श्वानांनी हल्ले केले आहेत.(kalyan domblivli news)

Street Dog News
Mumbai Street Dogs: भटक्या श्वानांची दहशत कायम; मार्च अखेर मुंबईतील ७० टक्के श्वानांचे लसीकरण

श्वानांच्या भितीने पहाटेच्या वेळी किंवा रात्री उशीरा रस्त्याने पायी प्रवास करणे म्हणजे नागरिकांना धडकी भरु लागली आहे. पालिका प्रशासनाने या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने नागरिक करतात परंतू प्रशासन तेवढे गांर्भियाने घेताना दिसत नाही.

कल्याण डोंबिवली परिसरात भटक्या श्वानाने चावा घेतल्याने नागरिक, लहान मुले गंभीर जखमी झाल्याची बाब यापूर्वी अनेकदा उघडकीस आली आहे. या भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ठराविक भागात त्यांचा वावर जास्त असल्याचे दिसून येते.(maharashtra news)

Street Dog News
Street Dogs : भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताना, ही समस्या तर दुर्लक्षित करत नाही ना?

नांदिवली गाव, आडिवली ढोकळी, दावडी गाव, डोंबिवलीतील एमआयडीसीतील निवासी भाग, सुनील नगर, दत्तनगर परिसर, आयरे गाव, कोपर रोड, जुना आयरे रोड यांसह अनेक परिसरात भटके श्वान मोठ्या प्रमाणात आहेत. खाद्याच्या शोधात हे श्वान झुंडीने फिरत असतात.

त्यातच काही नागरिक या श्वानांना खाद्य देत असल्याने त्यांच्याकडे ते झेपावतात, परंतू इतर वेळेस नागरिकांच्या पिशवीत, बॅगमध्ये खाद्य असले या आशेने ते नागरिकांवर धावून जातात. यामध्ये नागरिक, लहान मुले घाबरल्याने त्यांना ते चावा घेत असल्याचे दिसून येत आहे.

काही श्वान तर हातात काळी पिशवी दिसती की त्या नागरिकांवर धावत जाऊन ती पिशवी हिसकावून पळण्यासाठी हल्ले करतात. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.(kdmc news)

पहाटे किंवा रात्री उशीरा रस्त्याने एकट्याने प्रवास करणे म्हणजे नागरिकांच्या अंगावर काटाच उभा राहातो. या श्वानांच्या भितीने कित्येक नागरिक असा प्रवास टाळतात, दुसऱ्या मार्गाने जाण्याचा विचार करतात किंवा मग त्या वेळेत बाहेर पडणेच नको असे म्हणत आहेत.

नुकतेच तीन ते चार नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेत त्यांना जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागातील अनिल मांजरेकर (वय 70) व प्रमोद चौधरी (वय 68) हे दोन नागरिक श्वानाच्या चाव्याने जखमी झाले आहेत.(thane news)

Street Dog News
KDMC: कल्याण - डोंबिवली अनधिकृत बांधकामांचे माहेरघर

तर दोन दिवसांपूर्वी सुनिल नगर परिसरात रात्री कामावरुन घरी परतणाऱ्या तरुणीवर श्वानांनी हल्ला करत तीला चावा घेतल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांकडे या तिघांवर उपचार सुरु आहेत.(sunil nagar news)

एमआयडीसीतील पोटोबा हॉटेल ते मिलापनगर तलाव या मार्गावर श्वानांच्या झुंडी दिसतात. दोन ज्येष्ठ नागरिकांना एका श्वानाने पायाला चावा घेतल्याने ते त्यात जखमी झाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांत चार ते पाच नागरिकांना या श्वानांनी चावा घेतल्याचे प्रकार घडले आहेत.

काही श्वानप्रेमी हे भटक्या श्वानांना खाद्य टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात या परिसरात श्वान जमा झाले आहेत. कधी हे श्वान दुचाकीस्वारांच्या मागे लागताना दिसतात तर कधी शाळकरी मुलांच्या मागे लागतात.

त्यामुळे नागरिकांमध्ये लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे. याबाबत अनेक नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून अद्याप कार्यवाही होत नसल्याचे येथील रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले.

Street Dog News
KDMC News : कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांमुळे नागरिक बेहाल ; पालिकेचं दुर्लक्ष !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com