लाॅकडाऊनकाळातही विद्यार्थी गिरवताहेत शैक्षणिक धडे!

File Photo
File Photo

अंबरनाथ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वत्र लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होई नये, यासाठी उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालयाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. गेल्या 23 मार्चपासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थीही घरीच बसून आहेत. लॉकडाऊनच्या या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांचे शिक्षण घरी बसूनच सुरू राहावे, या हेतूने उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालयाने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शिकवायला सुरूवात केली आहे.

प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र वेळापत्रक
एसएसटी महाविद्यालायने घरोघरी बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिकवणी घेण्यासाठी प्रत्येक वर्गासाठी ठराविक वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसा त्या त्या विषयांचे प्राध्यापक त्या वेळापत्रकानुसार तासिका घेत असून त्याचा लाभ सर्वच विद्यार्थ्यांना होत आहे.

प्राध्यापकांचे वर्क फ्रॉम होम
डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून एसएसटी महाविद्यालायातील प्राध्यापकांनी वर्कफ्रॉमहोम सुरु केले आहे, तसेच विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षाही घेण्यात येते. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. सी. पूरसवानी तसेच उपप्राचार्य भारती पूरसवानी हे वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत.

महाविद्यालाय राबवत असलेले कोर्स
एसएसटी महाविद्यालाय व्यवस्थापनातर्फे विविध नवनवीन कोर्स विद्यार्थी तसेच प्राध्यापकांसाठी राबविण्यात येत आहेत. यात संगणकाची ओळख,  डिजिटल divide,  ऑडिसिटी,  IT क्षेत्राशी निगडीत असणारे विविध कोर्स पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येत आहे.

Students are taking online lessons even during lockdown!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com