विंटेज कार रॅलीवर खिळल्या नजरा

File Photo
File Photo

ठाणे : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ठाणे पोलिस वाहतूक शाखा, विंटेज आणि क्‍लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (डब्ल्यूआयएए) च्या सहकार्याने ‘विंटेज अॅण्ड क्‍लासिक कार्स अॅण्ड बाईक्‍स एक्‍झिबिशन’चे आयोजन ठाण्यातील रेमंड कंपनीमध्ये केले आहे.

यंदा ठाणेकरांसाठी खास म्हणून हे प्रदर्शन २५ फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवण्यात आले आहे. पाहताक्षणी ज्यांच्यावर डोळे अक्षरशः खिळून राहावेत अशा रोल्स रॉयस, बेंटले, अल्विस, हडसन यांसारख्या शानदार कार आणि हार्ले डेव्हिडसन, ट्रम्फ, रॉयल एन्फिल्ड आदींसारख्या दुचाकी ठाण्यातील रेमंड सभागृहात प्रदर्शनात ठेवल्या आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने रविवारी या विंटेज कारची भव्य रॅली ठाण्यातील रस्त्यावरून काढण्यात आल्याने ठाणेकरांच्या नजरा या अजबगजब वाहनांवर खिळल्या होत्या.

ठाण्यात विंटेज आणि क्‍लासिक कारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या सभागृहात सुरू असलेल्या या प्रदर्शनात दुर्मिळ वाहने प्रदर्शित करण्यात आली आहेत. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन आपले शताब्दी वर्ष साजरे करत असून त्यानिमित्ताने १८९६ पासून १९८० पर्यंतची विविध वाहने या प्रदर्शनात पाहायला मिळतात. ट्रम्फ, बीएसए, हार्ले डेव्हिडसन, रॉयल एन्फिल्ड, रोल्स रॉईल्स, बेन्टली, ऑल्विस, डॉज, कॅडिलॉक, फोर्ड, हडसन तसेच दुर्मिळ दुचाकीही या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.

१८९४ मधील मर्सिडीझ आणि १८९९ मधील फोर्ड कार या ठिकाणी असून पेबल बीच कोनकोर्स डी’ एलिंगस या प्रतिष्ठित कार शोची विजेता असलेली अल्विस कारदेखील प्रदर्शित केली आहे. या प्रदर्शनाला ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, रेमंडचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, डब्ल्यूआयएएचे कार्यकारी संचालक नितीन डोसा, फिवाचे (फेडरेशन इंटरनॅशनल डेस वेहिकल्स एन्शियंस) अध्यक्ष टिड्डो ब्रेस्टर्स आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाण्यात पहिल्यांदाच आयोजन
या वेळी आयुक्त फणसळकर यांनी, नागरिकांनी रस्ता सुरक्षेच्या नियमाचे पालन काटेकोरपणे करावे असे सांगितले; तर रेमंडच्या गौतम सिंघानिया यांनी, दुर्मिळ वाहनांचे एवढ्या मोठ्या प्रदर्शनाचे आयोजन ठाण्यात पहिल्यांदाच होत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे सांगितले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाण्यातील आनंदनगर चेकनाक्‍यापासून रेमंड प्रवेशद्वारापर्यंत २१.२ कि.मी. अशी विंटेज कार रॅली काढण्यात आली.

Take a look at the vintage car rally

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com