तन्मय सुळे ‘गेट २०२०’मध्ये देशात दुसरा

तन्मय सुळे
तन्मय सुळे

माणगाव (वार्ताहर) : माणगावातील तन्मय योगेश सुळे हा विद्यार्थी गेट २०२० या परीक्षेत देशात दुसरा आला आहे. ८ फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती. तन्मयने कॉम्प्युटर सायन्स निवडत परीक्षेत यश मिळवले आहे. त्याचे संपूर्ण देशभरातून कौतुक केले जात आहे. 

८ फेब्रुवारीला झालेल्या गेट २०२० या परीक्षेत तन्मयने कॉम्प्युटर सायन्स विषय घेऊन बसला होता. पदव्युत्तर शिक्षणासाठी व तांत्रिक शासकीय उच्च पदाच्या नोकरीसाठी ही परीक्षा अनिवार्य आणि महत्त्वाची मानली जाते. ही परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते. यावर्षी कॉम्प्युटर सायन्स या शाखेची परीक्षा ८ फेब्रुवारीला झाली. देशभरातून अंदाजे एक लाखावर विद्यार्थ्यांनी आपले नशीब अजमावले. या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी दोन, तीन वर्षे प्रयत्न करतात. परंतु, तन्मयने पहिल्याच प्रयत्नात AIR २ हा रॅंक मिळवून देशातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्याचे विशेष कौतुक केले जात आहे. यासाठी त्याने गेले वर्षभर अथक मेहनत घेतली आहे. ठाण्यातील व्हिजनगेटचे राजेश यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचा त्याने आवर्जून सांगितले. राजेश सरांमुळेच एवढे मोठे लक्ष मला गाठता आले, असे त्याने सांगितले.

तन्मयचे पहिली ते दहावी असे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्ह्यातील माणगाव या गावी झाले. त्यानंतर अकरावीपासूनचे शिक्षण घेण्यासाठी त्याला नवी मुंबई, ठाणे अशा विविध ठिकाणी घरापासून दूर राहावे लागले. या परीक्षेमुळे पुढील शिक्षणासाठी त्याला आयआयटी व तत्सम संस्थांची दारे उघडली आहेत. परंतु, त्याला संशोधनाची आवड असल्यामुळे तो बेंगलोर येथील आयआयएससी या संशोधनात भारतातच नव्हे, तर जगभरात नाव कमावलेल्या संस्थेत पुढील शिक्षण घेणार असल्याचे त्याने बोलून दाखवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com