

CNG Crisis in Mumbai
ESakal
मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईतील अनेक पंपांवर मागील सहा ते सात तासांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक पंपांवर गाड्यांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत. अंधेरी ते बोरिवलीपर्यंत पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक प्रभाव पडला आहे. येथील पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.