ओमिक्रॉनचा फुफ्फुसांना धोका कमी; इतर व्याधी असणाऱ्यांसाठी व्हेरिएंट घातक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

omicron
ओमिक्रॉनचा फुफ्फुसांना धोका कमी

ओमिक्रॉनचा फुफ्फुसांना धोका कमी; इतर व्याधी असणाऱ्यांसाठी व्हेरिएंट घातक

मुंबई :  कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन(omicron) हा तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत असला तरी ओमिक्रॉनमुळे फुप्फुसांना(Lungs) कमी इजा होते. आतापर्यंत ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांना घशात संसर्ग झाला आहे. गेल्या लाटेप्रमाणे ओमिक्रॉनने रुग्णांच्या फुफ्फुसांचे फार नुकसान केले नाही, असे राज्याच्या मृत्यू निरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले आहे; मात्र याचा अर्थ लोकांनी बेफिकीर राहावे, असे नव्हे. ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे किंवा आधीच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी हा व्हेरियंट घातक ठरू शकतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यकच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉनमुळे होणाऱ्या संसर्गाचा वेग जरी जास्त असला तरी त्यातून होणारे मृत्यू कमी आहेत.

हेही वाचा: सोलापूर : जुगार खेळणाऱ्या 17 जणांना पकडण्यासाठी 14 पोलिसांचे पथक

ओमिक्राॅनमुळे घशात जास्त संसर्ग होतो. श्वसननलिकेत त्याचा त्रास होतो. पण गेल्या लाटेप्रमाणे न्यूमोनियासारखा त्रास लोकांना होत नाही. ऑक्सिजनचा कमी वापर होत आहे. लोक लवकर बरे होत आहेत, असे डाॅ. अविनाश सुपे यांनी सांगितले. ओमिक्रॉनमुळे फुप्फुसांना कमी इजा होत असल्याने ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज जास्त पडत नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हण्णे आहे. मुंबईतील एकूण ११,३३६ ऑक्सिजन बेड्स पैकी ८२९१ रिक्त आहेत; तर ३०३५ बेडस वर रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतील १४६८ व्हेंटिलेटर बेडसपैकी ९८४ रिकामे आहेत, तर ४८४ भरलेले आहेत.

अनेक अभ्यासांमध्ये असा दावा केला जात आहे की, कालांतराने लशीपासून तयार झालेल्या अँटीबॉडीजची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे बुस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी हा डोस घ्यावा. जेणेकरून कोरोनाचा धोका काही प्रमाणात टाळता येईल, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे. लसीकरण न झालेल्यांना धोका अधिक राज्यात सध्या सक्रिय रुग्ण लाखांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापर्यंत मृत्युदर वाढण्याची भीती आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही व ज्यांना इतर व्याधी आहेत किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांमध्ये मृत्यू वाढू शकतील, असे डाॅ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top