लाईव्ह न्यूज

बांधकामात जांभा दगडाला प्राधान्य

बांधकामात जांभा दगडाला प्राधान्य
Published on: 

अलिबाग, ता. १५ (बातमीदार)ः रत्नागिरी जिल्ह्यानंतर आता रायगडमध्येही चिरांच्या (जांभा) दगडांना मागणी वाढली आहे. घरांचे, बंगले, फार्महाउस बांधताना जांभा दगडाला पसंती दिली जात आहे. त्‍यामुळे मातीच्या विटांची मागणी कमी झाली आहे. सध्या जवळपास सर्वच तालुक्‍यात वीजभट्ट्या सुरू झाल्‍या आहेत, मात्र मागणी कमी असल्‍याने हा व्यावसायिक आर्थिक अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.
भात कापणीची कामे पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये अलिबाग, रोहा, माणगाव, कर्जत, पेण, सुधागड, महाड आदी तालुक्यांमध्ये वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला जातो. शेतातील मातीतून विटा तयार केल्‍या जातात. जिल्ह्यात सध्या दीड हजारापेक्षा जास्‍त वीट भट्टी व्यावसायिक आहेत. चिखल तयार करण्यापासून वीट तयार करणे, तयार विटांचा थर लावणे, वीटा भाजणे अशी अनेक कामे मिळत असल्याने हा व्यवसाय वृद्धिंगत होत आहे.
होळी सुरू होईपर्यंत आदिवासी कामगार चार महिने याठिकाणी काम करीत असतात. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत जवळपास तीन हजार कामगारांना रोजगार मिळतो. टोलेजंग इमारतीपासून बैठी घरे, कार्यालये, बंगल्‍यांच्या बांधकामात विटांचा वापर सर्वाधिक होतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्ह्यात जांभा दगडांपासून घरे बांधण्याचा कल वाढला आहे.
तळ कोकणातील जांभा दगडांच्या घरांचा क्रेझ रायगड जिल्ह्यात वाढू लागला आहे. हा दगड रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सापडतो. नैसर्गिक आपत्तीत जांभा दगडाच्या बांधकामाचे नुकसान तुलनेने कमी होते.
मागणी वाढल्‍याने बांधकाम साहित्‍याच्या दुकानातही आता जांभा दगडाची विक्री होताना दिसते. अलिबागमध्ये जांभा दगडाचा वापर करून अनेक आलिशान इमले उभे राहिले आहेत. चार विटांचे काम एक जांभा दगड करीत आहे. त्‍यामुळे सिमेंट, रेतीचा वापरदेखील कमी प्रमाणात होतो. जांभा दगडाचा वापर वाढल्‍याने वीट व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

जांभा दगडाचे फायदे
जांभा दगड लाल रंगाचा असल्याने दिसायला आकर्षक
दगडाच्या वापरामुळे घर थंड राहते.
रेती, सिमेंटची बचत होते
भिंतींच्या प्लास्टरचा खर्च वाचतो
विटांमुळे प्लास्टरचा खर्च वाढतो.
हजार विटांमागे साडेसात ते दहा हजार रुपये मोजावे लागतात.
नग अथवा शेकडा स्वरूपात जांभा दगड मिळतो.


वीटा तयार होऊन विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतु ग्राहकांकडून मागणी फारच कमी आहे. चिरांचे दगड (जांभा) बांधकामासाठी वापरण्यावर भर दिला जात असल्याने विटांची मागणी कमी झाली आहे.
- सुधाकर ठाकूर, वीट भट्टी व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com