A grape variety of world class 'Ara'
A grape variety of world class 'Ara'esakal

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा द्राक्षांना मोठा फटका; 70 टक्के पिकाचा दर्जा खालावला; चांगले द्राक्ष महागले

Unseasonal Rain: द्राक्षांचा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावरच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा बाजारात द्राक्षांची आवक जानेवारीत सुरू झाली आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे ७० टक्के पिकाचा दर्जा खालावलेला आहे. परिणामी, चांगल्या दर्जाच्या द्राक्षांना बाजारात मागणी असल्याने वाढीव दराने विक्री होत आहे.

A grape variety of world class 'Ara'
Nashik Winter Update : निफाडला नीचांकी 5.6 अंश तापमान; द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी

नोव्हेंबरपासून बाजारात द्राक्षांची आवक सुरू होते. नोव्हेंबर ते मार्च, एप्रिलपर्यंत ही द्राक्षे बाजारात पाहायला मिळतात. नाशिक, तासगाव, सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, यावेळी हंगाम सुरू होण्याच्या वेळी अवकाळी पाऊस आल्याने द्राक्षांच्या वेलींचे मोठे नुकसान झाले आहे. घड लागण्यास सुरुवात होताच पाऊस आल्याने द्राक्षांमधील गोडवा राहिलेला नाही. परिणामी, उशिराने सुरू झालेल्या द्राक्षांच्या हंगामावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अशातच महिन्याभरानंतर बाजारात १० ते १५ गाड्या येत आहेत, पण चांगल्या दर्जाच्या दहा

A grape variety of world class 'Ara'
अवकाळीने द्राक्ष चवीला आंबट

किलोंच्या द्राक्षांच्या टोपलीला ५०० ते ६०० रुपयांचा भाव आहे. पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षाला ३०० ते ४०० रुपयांचा दर आहे. उत्तम दर्जाच्या काळ्या द्राक्षांना ७०० ते ८०० रुपये दहा किलोंचा दर आहे. मात्र, त्यांचे बाजारात येण्याचे प्रमाण कमी आहे. येत्या दहा दिवसांत ही आवक वाढण्याची शक्यता आहे.


- शिवाजीराव चव्हाण, व्यापारी

A grape variety of world class 'Ara'
Indapur Crime News : इंदापूरच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना २५ लाख रुपयांचा गंडा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com