White Onion: ठाण्याचा सफेद कांदा बाजारात दाखल

शेतकऱ्यांची मेहनत फळाला: सफेद कांद्याची बाजारात उत्सुकतेने वाट पाहताना!
White Onion
White Onionsakal

Thane News: ठाणे व पालघर जिल्ह्यातील सफेद कांदा बाजारात दाखल झाला आहे.

भिवंडी व वसईतील आठवडा बाजारात शेतकरी सफेद कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत; मात्र लांबलेल्या कांदा हंगामामुळे दर वधारले आहेत. दोन किलोच्या माळेला ८० ते १०० रुपयांचा चढा भाव मिळत आहे.

White Onion
Thane Crime News: नाशिक-मुंबई रोडवर कोट्यवधीचा अवैध मद्यसाठा जप्त

सफेद कांदा शेतात तयार झाल्यावर त्याची काढणी करून स्वच्छ धुतला जातो. त्यानंतर काही दिवस सावलीत सुकवतात. त्यानंतर या कांद्याच्या सुकलेल्या पातीच्या आधारे त्याच्या माळा बनवल्या जातात.

पालघर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी जेमतेम उत्पादित होत असलेले हे कांदे औषधी गुणधर्मामुळे नागरिक शेतकऱ्याच्या घरी जाऊन खरेदी करत होते; मात्र आता पालघरसह ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणीनुसार जादा उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे.

White Onion
Thane Traffic News: आता ठाण्यातील ट्रॅफिकला बसणार आळा; माजिवाडा जंक्शनला लागणार शिस्त

खरिपाचा हंगाम संपताच रब्बी पिकांबरोबर जास्त प्रमाणात कांद्याचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. तसेच उत्पादित कांदे स्वतः आठवडी बाजारात थेट विक्रीसाठी आणत आहेत. यात कोणताही अडत्या किंवा दलाल नसल्याने शेकऱ्यांना व ग्राहकांना दोघांनाही परवडणाऱ्या किंमतीत कांदे मिळू लागले आहेत;

मात्र सध्या हंगामातील अगदी पहिलाच कांदा विक्रीसाठी आल्याने दोन किलोच्या माळेला ८० ते १०० रुपये असा चांगला भाव मिळत आहे. दोन ते चार आठवड्यानंतर हाच कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्यानंतर माळेची किंमत कमी होईल व ग्राहकांना स्वस्तात कांदे खरेदी करता येईल, असे एका विक्रेत्याने सांगितले.

White Onion
Thane: अनधिकृत वीज जोडणीमुळे तरुणाचा मृत्यू; टपरी चालकावर गुन्हा

सफेद कांदा चवीला लाल कांद्याप्रमाणे उग्र नसून काहीसा गोड लागतो. दोन ते अडीच किलो वजनाच्या एका माळीमध्ये ३० ते ३५ कांदे असतात. तर काही माळा तीन किलोपर्यंत कांद्याच्या आकारमानानुसार असतात. सुरुवातीस बाजारात नवीन आलेल्या कांद्याच्या एका माळेचा भाव कांद्याच्या आकारानुसार ८० ते १०० रुपये आहे. नंतर आवक वाढल्यावर भाव कमी होतात.

आठवडा बाजारात ग्राहकांची गर्दी
अंबाडी, वज्रेश्वरी, मांडवी आठवडी बाजारात हे कांदे खरेदी करण्यासाठी बोरिवली, विरार, ठाणे, भाईंदर, मीरा रोड, घोडबंदर, नायगाव, वसई व नालासोपारा येथील ग्राहक येतात. कांद्याच्या तयार माळा मिळत असल्याने खरेदी केलेले कांदे साठवणीसाठी घरातील उंच ठिकाणी बांबूवर टांगून ठेवतात. त्यामुळे हवेत मोकळे राहिल्याने कांदे जास्त काळ टिकतात. खरेदी योग्य सुकलेले कांदे खरेदी करावेत, अन्यथा ते पुढे काळे पडण्याची भीती असते.

White Onion
Thane Traffic News: आता ठाण्यातील ट्रॅफिकला बसणार आळा; माजिवाडा जंक्शनला लागणार शिस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com