Mumbai AC local
Mumbai AC local sakal

Mumbai AC Local: उन्हाळ्यात एसी लोकलला मुंबईकरांची पसंती; तब्बल इतक्या हजार लोकांनी काढला पास

यात दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. |The information has been given by the railway administration that it has doubled

Mumbai AC Local: उन्हाळ्यातील उकाड्यापासून बचावासाठी आता एसी लोकलकडे प्रवाशांनी आपला मोर्चा वळविला असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर एका दिवसात तब्बल तीन हजार ५६१ तर मध्य रेल्वेवर दोन हजार ४३४ प्रवाशांनी मासिक पास काढला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Mumbai AC local
Mumbai AC Local : मध्य रेल्वेची एसी लोकल सुसाट; प्रवाशांची संख्या १ कोटीवर

उन्हाळ्यात मुंबईतील लोकलचा प्रवास नकोसा होतो. आता तर कडक उन्हाळा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मुंबईतील एसी लोकलकडे धावत घेत असल्याचे चित्र आहे. १ एप्रिल रोजी एका दिवसात पश्‍चिम रेल्वेवर तब्बल ३,५६१ तर मध्य रेल्वेवर २,४३४ प्रवाशांनी मासिक पास काढला. मार्च महिन्यात दिवसाला पश्चिम रेल्वेत दिवसाला पास काढणाऱ्यांची संख्या १,४०० तर मध्य रेल्वेत ९५४ होती. यात दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Mumbai AC local
AC Local: वाढत्या एसी लोकलमुळे सामान्य लोकलच्या फेऱ्यांवर परिणाम; सर्वसामांन्यांचे हाल!

पश्चिम रेल्वेवर दिवसभरात चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकलच्या ९६ फेऱ्या चालविण्यात येतात. त्यातून सुमारे एक लाख प्रवासी प्रवास करायचे. आता ही संख्या वाढत आहे. सोमवारी, १ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या २३ हजार ६२३ तिकिटांची विक्री झाली. तर तीन हजार ५१६ मासिक पास काढण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण, टिटवाळा, बदलापूरदरम्यान एसी लोकलच्या ६६ फेऱ्या होतात. सोमवारी १६ हजार ८८५ तिकीट तर दोन हजार ४३४ पासची विक्री झाली. यापूर्वी दिवसभरात १२ हजार ४६६ तिकीट आणि ९५४ पास काढले आहेत.
------------------
फुकट्या प्रवाशांवर नजर
उन्हाळ्यात एसी लोकलच्या अधिकृत प्रवाशांबरोबर फुकट्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने नियमितपणे धावत्या एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी अभियान वाढविणार असल्याची माहिती रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात आली आहे.

Mumbai AC local
AC Local : एसी लोकलचे प्रवासी दुप्पट! तीन महिन्यात एसी लोकलमध्ये ९ हजार फुकटे प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com