Mumbai News: तीन ठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना, ठाकरे आणि शिंदेंमध्ये होणार संघर्ष
Mumbai Newssakal

Mumbai Loksabha: तीन ठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना, ठाकरे आणि शिंदेंमध्ये होणार संघर्ष

त्यानंतरही प्रचारयंत्रणा कामाला लागली आहे |

Mumbai Loksabha: मुंबईतील सहा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यात तीन ठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना असा सामना रंगणार आहे.

तर इतर तीन ठिकाणी भाजप विरुद्ध आघाडी अशी लढत होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत तिसरा मजबूत उमेदवार किंवा बंडखोर रिंगणात नसल्यामुळे आघाडी आणि युतीत थेट लढत होणार आहे. या मुख्य लढतचा घेतलेला आढावा...


दक्षिण मुंबई


शिवसेना (ठाकरे गट) - अरविंद सावंत
शिवसेना (शिंदे गट) - यामिनी जाधव
महिनाभरापूर्वी उमेदवारी जाहीर झाल्याने अरविंद सावंत यांनी प्रचाराला तेव्हाच सुरुवात केली आहे. त्यांनी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी एकजुटीने प्रचार करताना दिसत आहेत. दुसरीकडे यामिनी जाधव यांची उमेदवारी जाहीर करायला वेळ लागला, मात्र त्यानंतरही प्रचारयंत्रणा कामाला लागली आहे.

Mumbai News: तीन ठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना, ठाकरे आणि शिंदेंमध्ये होणार संघर्ष
Loksabha Election 2024 : दिव्यांग मतदारांसाठी पाच हजार स्वयंसेवक ;समाजकल्याण अधिकारी कोरगंटीवार यांची माहिती


रंगत येण्यास उशीर
मुंबई महानगरातील मतदान प्रक्रिया ही शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्यात होत आहे. राजकीय पक्षांच्या हातात प्रचारासाठी अजून बराच वेळ आहे. काही पक्षांनी आधीच तर काही पक्षांनी उशिरा उमेदवारांची घोषणा केली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी आपला प्रचार सुरू केला असून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे आता निवडणूक प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत येईल, असे राजकीय वर्तुळातून सांगण्यात आले.

Mumbai News: तीन ठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना, ठाकरे आणि शिंदेंमध्ये होणार संघर्ष
Plaghar Loksabha Election : अखेर, भाजपने पालघरची जागा शिवसेनेकडून खेचली

दक्षिण मध्य मुंबई
शिवसेना (ठाकरे गट) - अनिल देसाई
शिवसेना (शिंदे गट) - राहुल शेवाळे
दक्षिण मध्य मुंबईत रिंगणात असलेले दोन्ही उमेदवार तुल्यबळ असून दोघेही पूर्वाश्रमीचे एकाच पक्षातील सहकारी आहेत. त्यामुळे दोघांना ही एकमेकांच्या डावपेचांची चांगलीच माहिती आहे. दोघांचीही उमेदवारी महिनाभरापूर्वी घोषित झाली आहे. दोघांनाही प्रचाराला सुरुवात केली आहे. राहुल शेवाळे यांनी प्रत्येक विभागातील विविध समाजाशी संवाद साधण्यावर अधिक भर दिला आहे. तर अनिल देसाई यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठका घेऊन अंतर्गत बांधणीवर भर दिला आहे.


मुंबई उत्तर पूर्व
शिवसेना (ठाकरे गट) - संजय दिना पाटील
भाजप - मिहीर कोटेचा
मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार फार पूर्वी जाहीर केले आहेत. त्यानुसार ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहे. कार्यकर्ते मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपचे मिहीर कोटेचा यांनी सध्या रॅली, मॉर्निंग वॉक, उद्यानात मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. त्यामुळे येथील लढत अधिक रंगतदार होणार आहे.

Mumbai News: तीन ठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना, ठाकरे आणि शिंदेंमध्ये होणार संघर्ष
Mumbai Loksabha: महायुतीच्या प्रचाराची धुरा फडणवीसांवर, आतापर्यंत घेतल्या तब्बल इतक्या सभा

उत्तर मुंबई
भाजप - पियूष गोयल
काँग्रेस - भूषण पाटील
भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई या मतदारसंघातून केंद्रीय उद्योग मंत्री पियूष गोयल यांची उमेदवारी मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून आपली प्रचार यंत्रणा सक्रिय आहे. समाजाच्या विविध स्तरातील लोकांशी ते संवाद साधत आहे. दुसरीकडे काँग्रेसने या ठिकाणावरून उमेदवार देण्यास उशीर केला आहे. तसेच भूषण पाटील हे पियूष गोयल यांच्या तुलनेत अतिशय नवखे उमेदवार आहे. असे असले त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.


उत्तर मध्य मुंबई
भाजप - उज्ज्वल निकम
काँग्रेस - वर्षा गायकवाड
उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांची तिकीट कापून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. राजकारणात नवे असल्यामुळे त्यांचा प्रचार धिम्या गतीने सुरू असला तरी भाजपकडून तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड यांनी प्रमुख पदाधिकारी, नाराज नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू केल्या आहेत. छोट्या सभा आणि प्रचारफेऱ्याही सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यांच्यासोबत प्रचारात सक्रिय झाले आहेत.

Mumbai News: तीन ठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना, ठाकरे आणि शिंदेंमध्ये होणार संघर्ष
Loksabha Election 2024 : राहुल गांधी यांची पुण्यात सभा

मुंबई उत्तर पश्चिम
शिवसेना (ठाकरे गट) - अमोल कीर्तिकर
शिवसेना (शिंदे गट) - रवींद्र वायकर
महिनाभरापूर्वी उमेदवारी घोषित झाल्यामुळे अमोल कीर्तिकर यांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. तर शिंदे गटाने तीन वेळा आमदार राहिलेल्या रवींद्र वायकर यांना मैदानात उतरवले आहे. या ठिकाणावरून तुल्यबळ लढत होईल, असे बोलले जात आहे.

Mumbai News: तीन ठिकाणी शिवसेना विरुध्द शिवसेना, ठाकरे आणि शिंदेंमध्ये होणार संघर्ष
Loksabha Election 2024 : ‘व्होट जिहाद’ हीच ‘इंडिया’ची रणनीती ; आणंदमधील सभेत पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com