लाईव्ह न्यूज

सम्राट अशोक विद्यालय शंभर टक्के निकाल

सम्राट अशोक विद्यालय शंभर टक्के निकाल
Published on: 

सम्राट अशोक विद्यालय शंभर टक्के निकाल
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : सम्राट अशोक विद्यालयाने सोळाव्या वर्षी दहावीचा निकाल १०० टक्के लावत उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विविध उपक्रमात सम्राट अशोक विद्यालय कायम अग्रेसर असून मुलांना आनंददायी शिक्षण देत शैक्षणिक गुणवत्तेत सुद्धा विशेष लक्ष देत असते. गणेश सुरेश लोखंडे ९३.८० टक्के गुण मिळवत प्रथम, मोहिनी जयेंद्र मालुसरे ९१. २० टक्के मिळवत द्वितीय तर भूमिका यशवंत पवार या विद्यार्थिनीने ८८.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. एकूण पन्नास विद्यार्थ्यांमधून ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवत १३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय यांनी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले. याबाबत मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही मुलांना सतत मार्गदर्शन करीत असतो. तसेच शेवटच्या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन गुणवत्ता वाढवली जाते. शिक्षकांचे प्रयत्न विद्यार्थ्यांची मेहनत पाहता निश्चितच शंभर टक्के निकाल लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com