पंतप्रधान मोदी, अंबानींचे फोटो दाखवून अडीच हजार विधवांची फसवणूक; वाचा काय आहे नेमकं प्रकरण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

  • रिलायन्स फाऊंडेशनकडून व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याच्या आदिवासी महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
  • पालघर जिल्ह्यातील अडीच हजार आदिवासी विधवा महिलांना एका भामट्याने सुमारे पावणे आठ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

मनोर : रिलायन्स फाऊंडेशनकडून व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याच्या आदिवासी महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील अडीच हजार आदिवासी विधवा महिलांना एका भामट्याने सुमारे पावणे आठ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

ही बातमी वाचली का? आडनावामुळे गर्भवती महिलेला कोरोना; चुकीच्या अहवालामुळे नाहक मनस्ताप

आरोपी राहुल वाडू (वय 25) विक्रमगड तालुक्यातील कुर्झे-दगडी पाड्यातील रहिवाशी आहे. तो मुंबईतील वरळी स्थित रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये सफाईदाराचे काम करीत होता. सफाईचे काम सोडल्यानंतर त्याने रिलायन्स फाउंडेशन नावाची बनावट संस्था स्थापन केली होती. तसेच संस्थेच्या नावाखाली विधवा महिलांकडून त्यांचे ओळखपत्र, फोटो आणि बँक पासबुक आदी कागदपत्रे जमा केली होती.

ही बातमी वाचली का? Good Work! सोसायटीतच तयार होत आहेत विलगीकरणाच्या सुविधा

आदिवासी विधवा महिलांना व्यवसाय करण्यासाठी करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन कडून 40 हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी आरोपी राहुल वाडू याने सुरवातीला तिनशे रुपये भरून ओळखपत्र घ्यावे लागेल अशी बतावणी करून सुमारे 2 हजार 580 विधवा महिलांना ओळखपत्र देण्यात आले होते. आणि त्यांच्याकडून प्रत्येकी तिनशे रुपयानुसार 7 लाख 74 हजार रुपये वसूल केले होते.

ही बातमी वाचली का? 'हे' होतं बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचं शेवटचं ट्विट...

ओळखपत्र मिळून सहा महिने उलटल्यानंतर आणि पाठपुरावा करूनही 40 हजार रुपये मिळाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच एका महिलेने मनोर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात जिल्ह्यातील हजारो महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मनोर पोलिसांनी राहुल वाडू याला अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून बॅनर, बायोमेट्रिक मशीन, लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही बातमी वाचली का? सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर 'या' आहेत सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...वाचा

पंतप्रधान, मुकेश अंबानींचे फोटो दाखवून दिशाभूल
या बनावट संस्थेत त्याने तीन पुरुष आणि आठ महिलांना कामावर ठेवले होते. आणि त्यांच्या मार्फत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन रिलायन्स फाऊंडेशन संस्थेच्या प्रचारला सुरवात केली होती. रिलायन्स फाऊंडेशन संस्थेच्या नावाचा गणवेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नीता अंबानी, मुकेश अंबानींचे फोटो, रिलायन्स समूहाचे व्यवसाय आणि प्रकल्पाच्या माहितीचे बॅनर विधवा महिलांना दाखवून त्यांची दिशाभूल करण्यात येत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand and five hundred tribal widows cheated by showing photos of Prime Minister Modi and anil Ambani