Kalyan Politics: ठाकरे गटाचा कल्याणचा किल्ला ढासाळला! पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Thackeray Leaders Join Shinde Shivsena: ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
Thackeray Leaders Join Shinde Shivsena

Thackeray Leaders Join Shinde Shivsena

ESakal

Updated on: 

डोंबिवली : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेसह विविध पदांवर कार्यरत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत भर पडल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com