
Thackeray Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. यातच निवडणूकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली आहे. ठाकरेंचे दोन्ही पक्ष म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र दिसण्याची शक्यता आहे. या सर्वाची सुरवात डोंबिवलीमधून होऊ शकते, अशी चर्चा दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरु आहे.