

Thackeray and shinde Shivsena Controversy in Ulhasnagar
ESakal
उल्हासनगर : शिवसेनेचे (ठाकरे गट) कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या भाजप प्रवेशानंतर श्रीरामनगर येथील शिवसेना शाखा रणांगणात बदलली. शाखेच्या ताब्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये झालेला शाब्दिक संघर्ष काही क्षणातच मारहाणीपर्यंत पोहोचला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.