Vadodara JNPT Highway: बदलापूरची समृद्धीकडे वाट, बदलापूर ते पनवेल २० मिनिटात पार करता येणार!

वाहतुकीची नवी सुविधा: बदलापूर-पनवेल मार्गाचे काम प्रगतीपथावर; महामार्गातील बोगद्याचे ५० टक्के काम पूर्ण!
Vadodara JNPT Highway: बदलापूरची समृद्धीकडे वाट, बदलापूर ते पनवेल २० मिनिटात पार करता येणार!

मोहिनी जाधव

बदलापूरहून नवी मुंबईतील विमानतळाचे अंतर आता वीस मिनिटात पार करता येणार आहे. वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या जोरात सुरु असून, बदलापूर पूर्व बेंडशीळ या गावातून जाणाऱ्या जेएनपीटी महामार्गावर नवी मुंबईला जोडणाऱ्या बोगद्याचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले असून, पुढील वर्षात हे काम पूर्ण होऊन, बदलापूर शहराचा सगळ्याच मोठ्या शहरांशी जवळचा संबंध जोडला जाणार असून, बदलापूर शहराची आता समृद्धीकडे वाट सुरू झाली आहे.

राज्यात वडोदरा ते जेएनपीटी महामार्गाचे काम जोरदार सुरू आहे राज्यात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रुंद असा हा आठ पदरी महामार्ग असणार असून, सदर रस्ता बदलापूर शहरातील बेंडशीळ या गावातून जात आहे. त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात वडोदरा आणि जेएनपीटी ची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून, या ठिकाणी पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम, हे मागील वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे

Vadodara JNPT Highway: बदलापूरची समृद्धीकडे वाट, बदलापूर ते पनवेल २० मिनिटात पार करता येणार!
Vadodara Boat Capsized: नियतीची क्रूर थट्टा! आई-वडिलांना १७ वर्षांनंतर झाली मुलगी; बोट दुर्घटनेत गमावला जीव

आजच्या घडीला हे काम ५० टक्के पूर्ण झाले असून जुलै २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल त्यानंतर, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मुख्य म्हणजे यामुळे बदलापूर शहराचा दळणवळणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कायापालट होणार असून, अनेक मोठमोठ्या शहरांना बदलापूर शहराची कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहे. या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या बेंडशीळ गावातून इंटरचेंज असणार आहे.

या ठिकाणी डोंगरातून जवळपास सव्वा चार किलोमीटर लांबी च्या बोगद्याचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर शहर हे नवी मुंबई, मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर, दिल्ली या प्रमुख शहरांना जोडले जाणार असून, बदलापूर ते पनवेल हे अंतर अवघ्या वीस मिनिटात कापता येणार आहे. तसेच मुंबईत देखील चाळीस मिनिटात पोहोचता येणार आहे.

Vadodara JNPT Highway: बदलापूरची समृद्धीकडे वाट, बदलापूर ते पनवेल २० मिनिटात पार करता येणार!
Vadodara Boat Incident: बोट सफारीसाठी रांगेत उभे होते विद्यार्थी, त्यांना कल्पनाही नव्हती.. वडोदऱ्यातील दुर्घटनेपूर्वीचा व्हिडिओ समोर

आज या बोगद्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी वडोदरा जेएनपीटी प्रकल्पाचे अधिकारी वर्ग तसेच, स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन भेट दिली. यावेळी बोगद्यात जाऊन प्रत्यक्ष या कामांची पाहणी करण्यात आली.

महाराष्ट्रात वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. हा महामार्ग बदलापूर मधून जात आहे त्यामुळे, बदलापूर जवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार आहे. पर्यायाने या ठिकाणी उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. त्यामुळे बदलापूर शहराची समृद्धीकडे वाट सुरु झाली असून, बदलापूर हे शहर या महामार्गामुळे देशात नाव रूपाला येणार आहे.

किसन कथोरे, आमदार

Vadodara JNPT Highway: बदलापूरची समृद्धीकडे वाट, बदलापूर ते पनवेल २० मिनिटात पार करता येणार!
Vadodara Violence: गुजरातमध्ये दिवाळीत हिंसाचार! पोलिसांवर दगडफेक, फेकले पेट्रोल बॉम्ब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com